इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

प्रासंगिक लेख: आपल्या शहरातील दुकानांमधूनच सणांसाठी खरेदी करावी

 आपल्या शहरातील दुकानांमधूनच सणांसाठी  खरेदी करावी


  श्रीमंत असणारे बरेच जण बाहेरील मोठ्या शहरातून खरेदी करत असतात परंतु आपण ज्या शहरात राहतो त्याच शहरातून सणावारांची खरेदी व्हायला हवी. जेणेकरून गोरगरिबांसह  सर्वांचाच सण गोड होईल.

 दिवाळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणावर कपडे, दाग दागिने,अनेक प्रकारच्या गृह सजावटीच्या वस्तू,दिवे,पणत्या, नवीन आस्थापनासाठी लागणारे साहित्य खरेदी आपल्याच शहरातून करायला पाहिजे. ज्यामुळे आपल्या आजूबाजूच्या सर्वच घटकांच्या गरजा भागवण्यास मदत होईल.

 आपणास घरकामगार, दुकान,छोटे मोठे उद्योग, कारखाने, आपले विविध व्यवसाय यासाठी  लागणारे सर्व कामगार, आपणास निवडून येण्यासाठी लागणारे मतदार हे बाहेरचे नसून आपल्या शहरातीलच असतात. मग सणावाराची खरेदी आपण बाहेरून का म्हणून करावी..? आपला पैसा हा आपल्या येथील लोकांच्या कामी आला पाहिजे. हि आपली भावना का नसावी..?

ज्या ज्या वेळी निसर्गाचा कोप होतो किंवा अपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी आजूबाजीची माणसेच कामाला येत असतात, पैसा नाही.. त्याकरिता आजूबाजूची माणसं आनंदी राहिली पाहिजेत अशी आपली प्रत्येकाची कृती असावी. एवढेच..

                               सेवकराम जाधव

                            परळी वैजनाथ, जि. बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट