उखळी बु.येथे पोस्टाचा मेळावा: विविध योजनांची दिली माहिती

 उखळी बु.येथे पोस्टाचा मेळावा: विविध योजनांची दिली माहिती

सोनपेठ, प्रतिनिधी.....

       डाक समुह विकास कार्यक्रमाचे अंतर्गत आज (दि.४) उखळी बु. येथे पोस्ट खात्याच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मेळावा आयोजीत करण्यात आला होता. ग्रामपंचायत कार्यालय येथे  हा मेळावा आयोजीत करणात आला.कार्यक्र‌मास सरपंच श्री.सावंत यांनी उपस्थित राहून जनतेस जास्तीत जास्त खाती काढण्याचे आवाहन केले.

          यावेळी साहाय्यक अधिक्षक डाकघर परभणी श्री व्हि. यु. कुलकर्णी यांनी पोष्टखात्याच्या विविध योजनांची माहिती व फायदे समजावून सांगीतले. विशेषतः इंडिया पोष्ट पेमेंट बँक मार्फत दिल्या जाणार्‍या 399 रुपयात रु. 10 लाखाचा विमा, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, किसान सन्मान योजना व इतर  शासकीय योजनांचे डिबीटी मार्फत येणारे अनुदान गावातले गावात मिळावे यासाठी पोष्ट बँकेचे खाती उघडण्याचे आवाहन करण्यात आले.

        हा कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी श्री. कृष्णा मुंढे, श्रीहरि लोखंडे, श्री.साळवे, श्री. बचाटे, श्री सिरसाट आदींनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !