दीपोत्‍सवाच्‍या स्‍वागतासाठी परळीकर सज्‍ज! बाजारपेठा सजल्या

 दीपोत्‍सवाच्‍या स्‍वागतासाठी परळीकर सज्‍ज! बाजारपेठा सजल्या


परळी वैजनाथ/प्रतिनिधी 

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्‍या दीपोत्‍सवाच्‍या स्‍वागतासाठी परळीकर सज्‍ज झालेले आहेत. दिवाळीनिमित्त नवीन कपडे, घराची सजावट करण्यासाठी लागणारे साहित्‍यासह अन्‍य खरेदीचा जोर सध्या बघायला मिळतो आहे. सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी आठवडी बाजारा दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठ मोंढा राणी लक्ष्मीबाई टावर, घरणीकर रोड, बस स्टँड रोड, मेनरोड परीसर ग्राहकांनी तुडूंब भरला होता.

दिवाळीच्या सजावटीसाठी आकर्षक असे आकाशकंदील बाजारात दाखल झाले आहेत.आकाश कंदील, दिवे, विद्युत रोषणाईसाठी दिव्‍यांच्‍या माळा असे गृहसजावटीचे भरपुर पर्याय व्‍यावसायिकांनी उपलब्‍ध करुन दिले आहे.तसेच दिवाळीत फराळ हा आकर्षणाचा केंद्र असतो. बाजारपेठेत रेडीमेड फराळाची मोठी मागणी आहे.बाजारपेठ गृहसजावटीच्‍या वस्‍तूंनी सजली आहे. घराला लावण्याच्‍या तोरणाचे भरपुर पर्याय येथे उपलब्‍ध झाले असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.दिवाळीचा सण हा उत्साहात साजरा होत असून बाजारपेठांसहित नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !