डाॅ.संतोष मुंडेंचा ह्रदय सत्कार

 दिव्यांगांसाठी डॉ. संतोष मुंडे म्हणजे देवदूतच -निवृत्त मुख्याध्यापक भागवत कराड



डाॅ.संतोष मुंडेंचा ह्रदय सत्कार

परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.....
          दिव्यांगाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आणि दिव्यांगांचे प्रश्न ,समस्या, अडीअडचणी यासाठी सदैव तत्पर असलेले दिव्यांगाचे कैवारी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे परळीतील डाॅ.संतोष मुंडे हे दिव्यांगासाठी देवदूतच असल्याचे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक भागवत कराड सर यांनी व्यक्त केले.
          महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग मंत्रालयाच्या दिव्यांग विभाग उपाध्यक्ष पदावर डॉ. संतोष मुंडे यांना संवैधानिक जबाबदारी देण्यात आली. ही दिव्यांगांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे. डॉ. संतोष मुंडे यांचे दिव्यांगांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या या पदावर त्यांची निवड ही त्यांनी केलेल्या दिव्यांगाच्या सेवेचे फळच आहे असे प्रतिपादन भागवत कराड यांनी व्यक्त केले. या निवडीबद्दल निवृत्त मुख्याध्यापक भागवत कराड सर यांनी संतोष मुंडे यांचा हृदय सत्कार केला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !