इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था

 एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था




मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. एकनाथ खडसे यांच्या उपचारासाठी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. खडसे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच त्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या