वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचे झाडावर बसून आंदोलन

 वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचे झाडावर बसून आंदोलन




अंबाजोगाई - गेल्या वीस वर्षापासुन वृक्षाची गणणा करावी व वृक्ष संवर्धन करावे या मागणीसाठी गेल्या वीस वर्षापासुन वृक्षमित्र अभियानचे सुधाकर देशमुख यांचे शासन दरबारी लढा लढत आहेत. परंतु या लढ्याला त्यांना अद्यापही यश आलेले नाही. अंबाजोगाई शहरातील रस्त्याचे चौपदरीकरीण होत असल्यामुळे रस्त्यात येणार्‍या वृक्षाचे पुनर्वरोपण करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा न्यायालयासमोरील असलेल्या शेकडो वर्षापासुनच्या वडाच्या झाडावर बसून देशमुख यांनी आंदोलन सुरू केले आहे. झाडाची कत्तल करण्याऐवजी त्याचे पुनर्वरोपन करावे अशी मागणी त्यांनी शासन दरबारी लावून धरली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर (पाटोदा) येथील वृक्षमित्र अभियानचे सुधाकर देशमुख गेल्या वीस वर्षापासुन नागरपुर ते मुंबई आधिवेशनादरम्यान कुटूंबा समवेत उपोषण केलेले आहे. या उपोषणामध्ये राज्यातील वृक्ष गणणा करण्यात यावी. महामार्गावरही अडथळा निर्माण करणार्‍या वृक्ष तोड करण्या ऐवजी त्याचे पुनर्वरोपण करण्यात यावे. याचा लढा अद्यापही सुरू आहे. अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व यशवंतराव चव्हाण चौक सहा पदरी रस्ता होणार आहे. त्यामुळे बांधकाम विभाग नगर पालिका प्रशासन व महसुल प्रशासनाने या कार्यवाहीमध्ये सहभाग घेतल्यामुळे या रस्त्याला अडथळा निर्माण करणार्‍या वृक्षाची व अतिक्रमणावर कार्यवाही करण्यात येत आहे. एकीकडे जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे वृक्ष लागवडीवर लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासन दरवर्षी पावसाळ्यात वृक्ष लागवडीचा केवळ प्रसिद्धी साठी प्रयत्न करतो. यातील किती वृक्ष जिवंत राहिले याकडे मात्र दुर्लक्ष होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीची आवश्यकता असून यासाठीच वृक्षमित्र देशमुख व कुंटूंब शासन दरबारी मागणी रेटत आहे. परंतु त्यांच्या मागणीकडे शासन न प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या वटवृक्षाची या रस्त्याच्या कामात तोडण्यात येणार असल्यामुळे या वृक्षाचे पुनर्ररोपन करण्यात यावे या मागणीसाठी वटवृक्षावर बसून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे प्रशासन कसे गांभीर्य घेते हे पहावे लागणार अहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार