मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीरे:4 नोव्हेंबर रोजी होणार पहिले शिबीर

 मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीरे:4 नोव्हेंबर रोजी होणार पहिले शिबीर


बीड, दि. 03 (जि. मा. का.) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत दि. 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच मतदान नोंदणीचे मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती व वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत.


            या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक मतदारांनी त्यांची मतदान नोंदणी करून घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आयोगाचे निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाद्वारे दि. 4 नोव्हेंबर 2023 (शनिवार) दि. 5 नोव्हेंबर 2023 (रविवार) दि. 25 नोव्हेंबर 2023 (शनिवार) आणि दि. 26 नोव्हेंबर 2023 (रविवार) या चार दिवशी बीड जिल्ह्यातील 228- गेवराई,  229-माजलगाव, 230- बीड, 231- आष्टी, 232- केज व 233- परळी एकूण सहा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत असून सर्व मतदारांनी मतदार यादी मध्ये मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती व वगळणीसाठी अर्ज सादर करावेत. तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम नुसार दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित ज्या युवकांना वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत किंवा होणार आहेत अशा युवकांची नव मतदार म्हणून मतदार यादीत नोंदणी करण्याकरता त्याचप्रमाणे जुन्या मतदार यादीत ज्यांची नावे दुबार आहेत ती वगळणे, ज्यांच्या नावात सुधारणा होती ती सुधारणा करणे आणि एका विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात स्थलांतर करावयाचे असल्यास ते स्थलांतरण करणे इत्यादी करिता सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या सहाय्याने तसेच Voter Helpline App ॲपद्वारे ऑनलाईन माध्यमांचा वापर करून व सदरील आयोजित विशेष शिबिरामध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !