पुणे येथील 'आयडियाथाॅन ' स्पर्धेत एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले

 पुणे येथील 'आयडियाथाॅन ' स्पर्धेत एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे  विद्यार्थी चमकले


नांदेड दिनांक ८ नोव्हेंबर प्रतिनिधी

 अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे( सिओईपी) येथे माईंडस्पार्क या तांत्रिक परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. अभियांत्रिकी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, सृजनशील तांत्रिक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यासाठी ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यामध्ये मराठवाड्यातील नांदेडच्या महात्मा गांधी मिशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश संपादन केले आहेत.सदर परिषदेत आयडियाथाॅन या प्रकारात अभियांत्रिकी  विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविणाऱ्या प्रकल्प स्पर्धेत नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील बी.टेक. संगणकशास्त्र अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणार्‍या  यश महाजन,कोंडीबा जोगदंड, तेजस कोटलवार  आणि अवधूत पाटील या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाला द्वितीय स्थान प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांस वीस हजार रूपयांचे रोख पारितोषिकही प्राप्त झाले आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी  भारतीय स्टीलची गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक उपाय सुचवले आहेत जसे इलेक्ट्रिक आर्क  फरनेस ,अक्षय ऊर्जे चा वापर,रियल टाईम क्वालिटी कंट्रोल  ,वर्कफोर्स ट्रेनिंग  इत्यादींचा वापर करता येऊ शकेल असे सुचविले आहेत.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे एमजीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कमलकिशोर कदम, एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.गीता लाठकर,उपप्राचार्य डाॅ.शिरिष कोटगीरे, संगणक शास्त्र अभियांत्रिकीच्या विभागप्रमुख डाॅ.अर्चना राजूरकर, मेंटर प्रा राहूलसिंग बिसेन आदींनी अभिनंदन केले.यावेळी प्रोफेसर ज्योती पाटील, प्रा.पंकज पवार आणि प्रा.भाग्यश्री कापरे-कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !