पोस्ट्स

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली !!

इमेज
  राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी         येथील नेहरू चौकातील मेघराज हॉटेलचे मालक भरत सोमवंशी,मेघराज सोमवंशी,शत्रुघ्न सोमवंशी यांच्या मातोश्री राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी यांचे वार्धक्याने आज दि.5 फेब्रुवारी रोजी सायं.5.30 वा.सुमारास निधन झाले.मृत्युसमयी त्या 95 वर्षे वयाच्या होत्या. पत्रकार महादेव शिंदे यांच्या त्या मावशी होत.       नेहरु चौक भागातील बाजीप्रभुनगर येथील रहिवाशी राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी  या अतीशय मनमिळाऊ होत्या. वयोमानापरत्वे वयाच्या  95  व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने सोमवंशी व शिंदे परिवाराचा आधारवड कोसळला आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने  सोमवंशी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.         दरम्यान, दिवंगत राणूबाई  सोमवंशी यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.6 रोजी सकाळी 10 वा.मोक्षधाम स्मशानभूमी परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाजीप्रभुनगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.

निवड :हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
  वंजारी महासंघ परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू गुट्टे परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखेच्या परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अंबाजी गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे.      वंजारी महासंघ, महाराष्ट्र राज्य युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष नितीन सोपानराव ढाकणे यांनी नुकतेच निवडीचे पत्र प्रदान केले आहे. परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अंबाजी गुट्टे हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कला व क्रीडा तसेच अध्यात्मिक क्षेत्रात सतत अग्रेसर राहून काम करणारे परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन  निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल अभिमन्यू  गुट्टे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

●अभिष्टचिंतन:पत्रकार संतोष जुजगर यांचा विशेष लेख >>>>प्रा.अतुल दुबे यांचे ‘अतुलनिय’ कार्य

इमेज
  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक प्रा.अतुल दुबे यांचे ‘अतुलनिय’ कार्य परळीच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय सहभाग ने तृत्वाचा वारसा अनेकांना चालत येतो. या नेतृत्वात संवेदनशीलपणा असेलच असे नसते. परंतु ज्याला नेतृत्वाचा वारसाही नाही आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर  ज्याला कळवळा येतो असे नेतृत्व हे अपवादानेच उदयाला येते. सर्व सामान्यांतुन उदयास आलेल्या नेतृत्वामध्ये एक प्रकारचे संवेदनशीलता भरलेली असतेच त्याचबरोबरीने आक्रमताही तेवढ्याच तीव्रतेने असते हे दिसुन येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे परळी शहरातील एक युवा नेतृत्व  प्रा.अतुल दुबे सर या धडपडत्या युवकाच्या रूपाने पहावयास मिळते. वेगवेगळ्या माध्यमातून व एक ध्येय समोर ठेवून सर्वसामान्यां प्रती असलेल्या जिव्हाळा अनेक आंदोलने व अनेक प्रश्नांची सोडवणुक करताना त्याच्यातील संवदेनशीलतेचा प्रत्यय नेहमीच पहावयास मिळाला. तसेच परळी शहराच्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अतुलनिय असणारे  प्रा.अतुल दुबे सर यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमीत्त त्यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.  प्रा.अतुल दु

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  शकुंतला माणिकराव धर्माधिकारी यांचे निधन परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.4 - येथील रहिवासी असलेल्या शकुंतला माणिकराव धर्माधिकारी (वय-87) यांचे रविवार दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.50 वा.लातूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीतील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश धर्माधिकारी,रमेश धर्माधिकारी,चंद्रकांत धर्माधिकारी यांच्या त्या आई होत तर माजी नगराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांच्या त्या आजी होत.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी, सूना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. धर्माधिकारी कुंटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

शिक्षणप्रेमी साहित्य रसिकांना मिळणार अभूतपूर्व मेजवानी

इमेज
  परळीत 11 फेब्रुवारी रोजी रंगणार 6वे  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन शिक्षणप्रेमी साहित्य रसिकांना मिळणार अभूतपूर्व मेजवानी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या   6 व्या  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनात साहित्य रसिकांना दर्जेदार साहित्यिकांची साहित्यिक मेजवानी मिळणार असून या एक दिवसीय साहित्य संमेलनास साहित्यिक,शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे मुख्य संयोजक रानबा गायकवाड व स्वागत समितीने केले आहे.       परळी येथे साप्ताहिक शिक्षण मार्गाच्या वतीने 6 वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. संत तुकोबाराय साहित्य नगरी, औद्योगिक वसाहत सभागृह येथे होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ञ ए.तु. कराड हे आहेत. संमेलनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त लेखक, दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या हस्ते होणार आहे. तर नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव व कै. रामभाऊ अण्णा खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खाडे हे स्वागत अध्यक्ष आहेत.      या एकदिवसीय

डॉ. तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांची प्रतिवर्षी वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त सेवा

इमेज
  प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गहिनीनाथ गडावर नेहरकर दाम्पत्याकडून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी डॉ. तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांची प्रतिवर्षी वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त सेवा पाटोदा (प्रतिनिधी) - संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने डॉ.तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांच्या वतीने याही वर्षी संत वामनभाऊ समाधी मंदिरावर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.  मूळ घाटशीळ पारगाव येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते तथा जागतिक आरोग्य सल्लागार डॉ.तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई तुकाराम नेहरकर या दाम्पत्याने संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हेलिकॉप्टरमधून समाधीस्थळी पुष्पवृष्टी करण्याचा पायंडा सुरू केला आहे.  शनिवारी (दि.03) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते समाधी स्थळी मानाची महापूजा करण्यात आली, यावेळी प्रथमच वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर हे ही उपस्थित होते.  दरम्यान पुण्यतीथी सोहळ्याची सांगता काल्याच्या हरिकीर्तनाने झाली. यावेळी संत वामनभाऊ यांच्या समाधीवर 11.45 वा नेहरकर दाम्पत्याने आयोजित केलेल्या हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात आली. 

ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये लावण्याई पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन: सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदेही राहणार उपस्थित

इमेज
  ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये लावण्याई पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन:  सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदेही राहणार उपस्थित परळी वैजनाथ ,  प्रतिनिधी......  परळी वैजनाथ येथील डी एस एम प्रतिष्ठान संचलित लावण्याई पब्लिक स्कूलचे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या व लगन या मराठी  चित्रपटातील  सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदे (राजनंदिनी) त्यांच्या उपस्थितीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन- 2024 दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पत्रकार अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.  या कार्यक्रमांमध्ये या शाळेचे चिमुकले विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्याताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला सकारात्मक पत्रकारितेतून महाराष्ट्रात नवा मापदंड निर्माण करणारे बीड जिल्ह्यातील सृजनशील,जेष्ठ पत्रकार दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर, परळी शहराचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, दिव्यांग
इमेज
  शोभायात्रा: महर्षी दयानंदांच्या जयघोषाने परळी शहर दुमदुमले     परळी वैजनाथ,दि.३-             थोर समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहरात महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व आर्य समाज परळीच्या संयुक्त विद्यमाने येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात राज्यस्तरीय आर्य महासंमेलनास कालपासून उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्त परळी शहरातून आज (दि.३) भव्य स्वरूपात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. कालपासून येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात राज्यातील विविध ठिकाणाहून आर्य समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.         सकाळी विविध यजमानांच्या उपस्थितीत यज्ञ संपन्न झाला.नंतर शहरातील शिवाजी चौकातून शोभायात्रा निघाली. यात शहरातील चौका - चौकात विविध शाळांचे विद्यार्थ्यांनी लेझीम, योगासने विविध कला प्रदर्शन इत्यादींचे सादरीकरण केले. या शोभायात्रेत सर्वात पुढे घोडेस्वार, नंतर शाळांचे विद्यार्थी, गुरुकुलाचे ब्रह्मचारी, राज्यातून आलेले आर्य कार्यकर्ते , महिला अपूर्व उत्साहात पुढे पुढे चालत

ज्योतिर्लिंग स्थानाबाबत पुन्हा खोडसाळपणा: राहुल गांधीच्या वृत्तांकनात झारखंडच्या वैद्यनाथ धामचा ज्योतिर्लिंग म्हणून उल्लेख

इमेज
  ज्योतिर्लिंग स्थानाबाबत पुन्हा  खोडसाळपणा: राहुल गांधीच्या वृत्तांकनात झारखंडच्या वैद्यनाथ धामचा ज्योतिर्लिंग म्हणून उल्लेख परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           काँग्रेस नेते राहुल गांधी हे झारखंड येथील वैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी गेले होते. राष्ट्रीय वृत्तवाहिन्या यांनी वैद्यनाथ धाम चा उल्लेख बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असा केला परंतु यामध्ये महाराष्ट्रातील मराठी मीडियाने सुद्धा कोणतीही कसर न ठेवता व कुठलाही विवेक जागृत न ठेवता सरळ सरळ ज्योतिर्लिंग म्हणून झारखंड येथील वैजनाथ धामचाच उल्लेख करून वृत्तांकन केल्याने परळीतील शिवभक्त व तमाम महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये या मीडियाचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.          बारा ज्योतिर्लिंगाचा उल्लेख करत असताना अनेक वेळा जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील पंचम ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ चा उल्लेख टाळला जातो. हा मुद्दा वारंवार पुढे येत असतो. सर्व शास्त्रसंमत व धर्मशास्त्रसंमत त्याचबरोबर सर्व ऐतिहासिक पुरावे, सर्व शंकराचार्य व साधू समाजाचे मतप्रवाह हे पंचम ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील परळी वैजनाथ येथील वैद्यनाथच आहे. असे असतानाही आणि

मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा

इमेज
  मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे.         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टवर लिहिलंय की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारत देशाची सेवा करण्याचे काम केले. केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे, त्यांची भाषणे आमच्यासाठी दिशादर्शक आणि समृद्ध असा अनुभव देणारी ठरली आहेत. गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण आडवाणी सक्रिय राज

श्री सरस्वती विद्यालय, परळी वै, च्या माजी विद्यार्थ्यांचा ४१ वर्षांनंतरचा स्नेह मिलन सोहळा उत्सहात

इमेज
  श्री सरस्वती विद्यालय, परळी वै, च्या माजी विद्यार्थ्यांचा ४१ वर्षांनंतरचा स्नेह मिलन सोहळा उत्सहात परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... दि. २७ जानेवारी २०२४ रोजी स्नेह मिलनाच्या पुर्व संध्येला सायंकाळी सर्व वर्ग मित्र मैत्रिणींच्या ४१ वर्षानंतर भेटीचा योग जुळवून आणला त्यावेळी प्रत्येकाच्या चेहन्यावर एक आनंद दिसून येत होता, कांही वर्ग मैत्रिणीना आश्रू आनवर होत होते, जवळपास ६०-७० वर्ग मित्र मैत्रिणीची यावेळी भेट झाली, प्रत्येकांनी आपला परिचय देवून सायंकाळी भोजन करून दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाची चर्चा केली. दिनांक २८ जानेवारी रोजी श्री सरस्वती विद्यालय परळी वैजनाथ शाळेतील सन १९८२-८३ या दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा ४१ वर्षानंतर स्नेह मिलनाचा सोहळा अक्षता मंगल कार्यालय येथे पार पडला. या स्नेह मिलन सोहळयास सर्व दुरवर असलेली वर्ग मित्र मैत्रीणी एकत्र आले. पहिल्या सत्रामध्ये सकाळी जिजामाता उद्यान येथे जाऊन फोटो सेशन करून शाळेमध्ये जाऊन तिथे जुन्या आठवणींना उजाळा देत उपस्थित सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आठवणीनां उजाळा दिला. शाळेमध्ये शिक्षकांनी वर्गात

सुरश्री संगीत विद्यालयाचे घवघवीत यश

इमेज
  सुरश्री संगीत विद्यालयाचे घवघवीत यश सौ. मीना सोमवंशी यांनी विद्यालयासह केंद्रात प्रथम येण्याचा पटकावला बहुमान अंबाजोगाई, प्रतिनिधी:-   अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ ,वाशी मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या नोव्हेंबर-डिसेंबर 2023  परीक्षेत सौ. मीना सोमवंशी   यांनी घवघवीत यश संपादन केले. संपूर्ण भारतामध्ये व भारताबाहेरील अनेक देशांमध्ये शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार परीक्षेच्या माध्यमातून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ वाशी, मुंबई मार्फत केला जातो. नोव्हेंबर-डिसेंबर 2023 दरम्यान झालेल्या संगीत विशारद पूर्ण  परीक्षेत सौ.मीना सोमवंशी यांनी  सुरश्री संगीत विद्यालय आंबेजोगाई येथून फॉर्म भरून परीक्षा देऊन  सुयश प्राप्त केले आहे. बालगंधर्व संगीत महाविद्यालय अंबाजोगाई केंद्र तसेच सुरश्री संगीत विद्यालय या दोन्हीमध्ये सर्वप्रथम येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. संगीत विशारद पूर्ण परीक्षेसाठी सुरश्री संगीत विद्यालयाचे संस्थापक-संचालक  संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.ते पंडित शिवदासजी देगलूरकर यांचे शिष्य आहेत. सुरश्री संगीत विद्यालयातून अनेक विद्य

गायकवाड, साबणे ,फुटके ,ढाकणे, शिंदे, जोशी, आरबुने या पत्रकारांचा मूकनायक पुरस्काराने सन्मानित

इमेज
  अस्तित्व आणि अस्मितेसाठी मूकनायक दिशादर्शक-डॉ. सिद्धार्थ तायडे मूकनायक पत्रकारितेतील एक ऐतिहासिक अध्याय-  मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये समाजासाठी पत्रकार आणि पोलीस दोघांचेही कामे  महत्त्वाचे- पो नि उस्मान शेख गायकवाड, साबणे ,फुटके ,ढाकणे, शिंदे, जोशी, आरबुने या पत्रकारांचा मूकनायक पुरस्काराने सन्मानित परळी /प्रतिनिधी        अस्तित्व आणि अस्मितेसाठी महामानव, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले वर्तमानपत्र मूकनायक आजही दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन प्रख्यात  लेखक-दिग्दर्शक प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे  यांनी केले. ते मूकनायक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. तर मूकनायक पत्रकारितेतील एक ऐतिहासिक अध्याय असल्याचे मत परळी औष्णिक विद्युत  केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांनी केले. संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख म्हणाले की, समाजासाठी पत्रकार आणि पोलीस दोघांचेही कार्य अतिशय महत्त्वाचे असून ते समाजाचे मार्गदर्शक बनू शकतात. परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने दि. ३१ जानेवारी रोजी परळी येथील व्हीआयपी रेस्ट हाऊस हॉल मध्ये आयोजित

परळीचे 'सुवर्णकाररत्न' रमेश मुंडीक यांचा सामाजिक योगदानाबद्दल धारासुर गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार

इमेज
  परळीचे 'सुवर्णकाररत्न' रमेश मुंडीक यांचा सामाजिक योगदानाबद्दल धारासुर गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी     परळी येथील सर्व परिचित सुवर्णकार व 'सुवर्णकाररत्न' पुरस्काराने सन्मानित असलेले रमेश मुंडीक यांच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांच्या मूळ गावी धारासुर येथे आयोजित वार्षिक सप्ताहात गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.       धारासुर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू झाला असून प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा सुरू आहे. या भव्य दिव्य सोहळ्यात परळी येथे आपल्या सामाजिक कार्यातून वेगळा ठसा उमटवलेले व 'सुवर्णकाररत्न' पुरस्काराने सन्मान झालेले रमेश मुंडे धारासुरकर यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर रमेश मुंडीक यांनी गावातील विविध धार्मिक कार्यक्रमात अत्यंत आवश्यक असणाऱ्या पन्नास हजार रुपयांच्या मृदंगाच्या दोन घोड्या दान दिल्या. यावेळी रमेश मुंडीक व परिवाराच्या वतीने श्रीमद् भागवत ग्रं

पंकजा मुंडेंचा खांदा दुखवला: आठवड्याभराचा दौरा रद्द

इमेज
  पंकजा मुंडेंचा खांदा दुखवला: आठवड्याभराचा दौरा रद्द  भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांनी पुढील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांनी याबाबत एक्सद्वारे माहिती दिली आहे. एक्सवर पोस्ट करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने मला हा आठवडा treatment घ्यावी लागेल .. माझे सर्व कार्यक्रम पुढे ढकलत आहे … प्रवास करण्याची परवानगी नाही..” दुखापतीची माहिती देताच त्यांच्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट्स आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी यापुढे काळजी घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

सर्वेक्षणास २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

इमेज
  मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मुंबई, ‍‍दि. ३० : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी दि.३१ जानेवारी २०२४ पर्यत होता. तथापि काही ठिकाणी सर्वेक्षणास आणखी कालावधीची आवश्यकता असल्याने या सर्वेक्षणासाठी दि.०२ फेब्रुवारी २०२४ पर्यत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती आयोगामार्फत प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. आयोगामार्फत प्रगणकांना सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती मोबाईल अॅप्लीकेशनमधील प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जात आहे. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जात नाही. सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. नागरिकांनी सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन आ

वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड यांचे सांत्वन

इमेज
  वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड यांचे अनेकांकडून सांत्वन परळी, प्रतिनिधी वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश आप्पा कराड यांचे वडील शेषेराव संपतराव कराड यांचे गुरुवार दि. 24 जानेवारी रोजी निधन झाले.त्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील मान्यवर कराड कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटी घेऊन शोकसंवेदना व्यक्त करत आहेत.     आज माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे,मनसेचे नेते प्रकाश महाजन, रा.काॅ.नेत्या प्रा. सुशिलाताई मोराळे,सोलापुर येथील  उदयशंकर पाटील,अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर(पापा) मोदी, सर्जेराव तांदळे (भाजपा जिल्हा  सरचिटणीस) जालनाचे ,राजेंद्र राख ,बाळासाहेब राख ,मुन्ना फड ,टिव्ही 9 चे रिपोर्टर  संभाजी मुंडे आदींनी वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड यांचे सांत्वन केले.

पांगरी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीर

इमेज
  फेसबुकवरुनच रोज बाय बाय...        सांग तुला गावाकडे यायचे का नाय..     ........कवी अरुण पवार पांगरी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात कवी अरुण पवारांनी दिली बहारदार कवितांची मेजवानी परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने पांगरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष युवती शिबीराचे आयोजन सोमवार (ता.२९) ते रविवार (ता.०४) दरम्यान करण्यात आले आहे. शिबीराच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिध्द कवी अरुण पवारांच्या काव्य मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते.काव्य मैफीलीस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.                  काव्य मैफीलीच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विनोद जगतकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमास कवी अरुण पवारसह, माऊली मुंडे पाटील, डॉ प्रविण दिग्रसकर, डॉ राजर्षी कल्याणकर, डॉ रंजना शहाणे, प्रा. विणा भांगे, प्रा विशाल पौळ, प्रा डॉ विलास देशपांडे, मुख्याध्यापिका श्रीमती विभुते, नागभूषण फुलारी उपस्थित होते. यावेळी कवी अरुण पव

पुन्हा आंदोलनाने उपसले हत्यार

इमेज
  पुन्हा एल्गार: जरांगे-पाटलांचे 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे. राज्य सरकारने येत्या 15 दिवसात सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. 9 तारखेपर्यंतची ही डेडलाईन आहे. जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येत्या 9 तारखेला सरकारला दिलेल्या मुदतीचे 15 दिवस पूर्ण होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटील हे रायगडावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचं स्पष्ट केलं. राज्य सरकारमध्ये बेबनाव आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळी स्टेटमेंट येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे नोटिफिकेशन्स काढतात आणि दुसरीकडे आम्ही केंद्रापर्यंत जाऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. ही दोन स्टेटमेंट का? कशासाठी? मराठ्यांना झुलवत ठेवायचं आहे काय? मराठ्यांची मते नको आहेत काय?

विद्वानांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

इमेज
परळीत २,३,४ फेब्रुवारी रोजी महर्षी दयानंद  द्विजन्मशताब्दी सोहळा     विद्वानांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम परळी वैजनाथ -३०-           समग्र क्रांतीचे अग्रदूत व थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात येत्या २,३ व ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय आर्य नेते व प्रसिद्ध विद्वानांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात द्विजन्मशताब्दी सोहळयाचे  आयोजन  होत आहे.             महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व आर्य समाज परळीच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या  कार्यक्रमात तिन्ही दिवस विविध विषयावरील संमेलने, योग शिबिर ,वेदपारायण यज्ञ ,भव्य शोभायात्रा, प्रबोधनपर व्याख्याने ,गुरुकुल वार्षिकोत्सव , शतायुषी तपस्वी व्यक्तिमत्व श्री स्वामी सोममुनिजी गौरव, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व अभ्यासू व्यक्तिमत्त्वांचा सत्कार असे कार्यक्रम पार पडतील. या कार्यक्रमास दिल्ली येथील वरिष्ठ आर्य नेते श्री विनय आर्य, प्रकाश आर्य, वैदिक विद्वान सर्वश्री प्रा. सोनेरावजी आचार्य (पुणे) पं. प्रियदत्त शास्त्री ( हैदराबाद) , पं. राजवीर शास्त्री (सोलापूर), प

अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण; एकनाथ शिंदेंची घोषणा

इमेज
  अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण; एकनाथ शिंदेंची घोषणा मुंबई : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचं अभिनंदनही केलं आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकापर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

इमेज
  परळीजवळ थरारक आपघात: बोअरची गाडी वीजवाहक तारांना चिकटली; दोन मृत्यूमुखी दोन जखमी परळी वैजनाथ, प्रतिनिधी      परळी शहराजवळ दुपारी १२.१५ वा.सुमारास एक थरारक अपघात घडला आहे.बोअरवेल पाडण्यासाठी आलेल्या गाडीचा वीज वाहक तारांशी संपर्क आला व करंट उतरून या बोअरच्या गाडीत असलेले दोन मजूर मृत्युमुखी पडले. तर अन्य दोन मजूर जखमी झाले आहेत. मृत्यू पावलेल्या मजुरांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयात उत्तरे तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. दोन जखमींवर येथेच उपचार सुरू आहेत.       परळी तालुक्यातील वाघबेट येथे पाण्याचा बोर पाडण्यासाठी ओरिसा राज्यातील मजुरांसह बोरवेल मशीन घेऊन  सहा जणांचे एक पथक आले होते. या गावातील बोरवेल पाडण्याचे काम संपल्यानंतर बोरवेलची ही गाडी परळी शहराकडे येत होती. रस्त्यात वीजवाहक तारांना या गाडीचा संपर्क झाला. वीज वाहकतारांचा विद्युत प्रवाह संपूर्ण लोखंडी पाईप असलेल्या या गाडीत उतरला. या गाडीमध्ये एकूण सहा मजूर बसलेले होते. त्यापैकी करंट लागून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण जळून जखमी झाले आहेत. बोरवेल वरील हे सर्व मजूर ओडिसा राज्यातील असून  गोबिंदा जबलसिंग गौंड

राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश

इमेज
  राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. देशभरातील १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज (सोमवारी) अधिसूचना जारी केली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज (सोमवारी) अधिसूचना जारी करून राज्यसभेच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. 13 राज्यांतील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे, तर दोन राज्यांतील उर्वरित सहा सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्या ठिकाणच्या निवडणुका २७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. राज्यसभेचे एक तृतीया

दहावी-बारावीची कॉपीमुक्त परीक्षा!

इमेज
  दहावी-बारावीची कॉपीमुक्त परीक्षा! प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठीही भरारी पथके; यंदा सरमिसळ पद्धत अन्‌ दहा मिनिटे जादा वेळ इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, म्हणून यंदा बोर्डाने प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल.             अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून १०० टक्के निकालासाठी परीक्षेवेळी भरारी पथकांचा अंदाज घेऊन वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगितली जातात ही वस्तुस्थिती आहे. अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची खात्री असलेल्या शाळांमध्येच प्रवेश घेतात अशीही स्थिती आहे. त्यासंदर्भातील तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे अनेक शाळांची चिंता वाढली आहे. पण, विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेची चिंता न करता, प्रश्नांचा सराव व नोट्‌स काढून त्याच्या अभ्यासावर भर दिल्यास परीक्षा सोपी जाईल, अ

मुख्य डाक घर येथील आधार केंद्राचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ; शासकीय शुल्कात मिळणार सेवा

इमेज
 मुख्य डाक घर येथील आधार केंद्राचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ; शासकीय शुल्कात मिळणार सेवा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.29 - शहरातील मुख्य डाक घर येथील आधार केंद्राचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.परळी वैजनाथ पोस्ट मास्तर सी.बी.हरदास यांच्या वतीने हे आवाहन करण्यात आले आहे.पोस्ट ऑफीसच्या कार्यालयीन वेळेमध्ये हे आधार केंद्र सुरू राहणार आहे. या आधार दुरुस्ती केंद्रावर नवीन आधार काढणे यासह आधार धारकाचे चे फोटो, नाव,पत्ता,मोबाईल नंबर,इमेल आयडी बदलणे,हाताचे ठसे अद्यावत करणे अशा सर्व सुविधा शासकीय शुल्कामध्ये मिळणार आहेत.परळी परिसरातील जास्तीत जास्त  नागरिकांनी या आधार केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन परळी मुख्य डाक घर याच्या कडून करण्यात आले आहे.