श्री सरस्वती विद्यालय, परळी वै, च्या माजी विद्यार्थ्यांचा ४१ वर्षांनंतरचा स्नेह मिलन सोहळा उत्सहात

 श्री सरस्वती विद्यालय, परळी वै, च्या माजी विद्यार्थ्यांचा ४१ वर्षांनंतरचा स्नेह मिलन सोहळा उत्सहात



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

दि. २७ जानेवारी २०२४ रोजी स्नेह मिलनाच्या पुर्व संध्येला सायंकाळी सर्व वर्ग मित्र मैत्रिणींच्या ४१ वर्षानंतर भेटीचा योग जुळवून आणला त्यावेळी प्रत्येकाच्या चेहन्यावर एक आनंद दिसून येत होता, कांही वर्ग मैत्रिणीना आश्रू आनवर होत होते, जवळपास ६०-७० वर्ग मित्र मैत्रिणीची यावेळी भेट झाली, प्रत्येकांनी आपला परिचय देवून सायंकाळी भोजन करून दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाची चर्चा केली.

दिनांक २८ जानेवारी रोजी श्री सरस्वती विद्यालय परळी वैजनाथ शाळेतील सन १९८२-८३ या दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा ४१ वर्षानंतर स्नेह मिलनाचा सोहळा अक्षता मंगल कार्यालय येथे पार पडला. या स्नेह मिलन सोहळयास सर्व दुरवर असलेली वर्ग मित्र मैत्रीणी एकत्र आले. पहिल्या सत्रामध्ये सकाळी जिजामाता उद्यान येथे जाऊन फोटो सेशन करून शाळेमध्ये जाऊन तिथे जुन्या आठवणींना उजाळा देत उपस्थित सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आठवणीनां उजाळा दिला. शाळेमध्ये शिक्षकांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचे वर्ग घेऊन जुन्या आठवणीं आनुभवल्या, शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सर्व वर्ग मित्र व मैत्रिणींचे व शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यांत आले. यावेळी जवळपास १२० वर्ग मित्र मैत्रिणी उपस्थित होते. सरस्वती पुजन करून उपस्थित सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यांत आला. यावेळी श्री देशमाने सर, घाटगे सर, मुंवडा सर, चाटे सर, कवडे सर, पी. एन. देशपांडे सर, नानेकर सर, सांगळे सर, गडम सर, शिवाजीराव देशमुख, नरवणे सर उपस्थित होत. त्यानंतर उपस्थित शिक्षकांच्या हस्ते सर्व वर्ग मित्र मैत्रिणींचे "सण आनंदाचा... उत्सव मैत्रीचा..." या परिचय पुस्तक व ग्रुप फोटोचे अवलोकन करण्यांत आले. सर्व वर्ग मित्र मैत्रिणींना परिचय पुस्तीका व ग्रुप फोटो भेट देण्यांत आली. त्यानंतर श्री पी. एन. देशपांडे सरांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यांत आला. या वाढदिवसा प्रसंगी श्री पी. एन. देशपांडे सरांना भावना व्यक्त करतांतना अश्रु अनावर झाले. यावेळी त्यांचे जवळचे मित्र श्री कवडे सरांनी मित्राप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.

दुपारच्या सत्रामध्ये विविध खेळ खेळण्यांत आले. या सत्रामध्ये कांही वर्ग मित्र मैत्रिणींनी आपल्या शाळेतील आठवणी सांगुन भावना व्यक्त केल्या. कांहीनी या मैत्रीचे रूपांतर एक कुटूंबात झाले पाहिजे, वेळोवेळी प्रत्येकांने सुख दुखःत सहभागी झाले पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी डॉ किरण बंग हीने गाणी म्हणतांना गाण्याची उलट शब्द रचना करून गाणी लिलया गायली. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन परभणी येथील सौ अबोली जोशी यांनी केले.

सायंकाळी औरंगाबाद येथील गजानन भावसार यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित केला होता, सर्वांनी या संगीत रजनीच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. हा स्नेह मिलनाचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे श्री जयप्रकाश जैन, सुर्यभान नाना मुंडे, शंकर आडेपवार, जगदीश बियाणी, नागनाथ पारसेवार, प्रशांत कराड, सौ सविता मुंडे यांनी नियोजन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुनिल गर्ने, रमण भन्साळी, राजेश ठोंबरे, सोनी भाटीया, तुकाराम देशमुख, सौ किरण बजाज, शैला सारडा, किरण बंग व सर्व वर्ग मित्र मैत्रिणी यांच्या सहकार्याने स्नेह मिलनाचा कार्यक्रम यशस्वी झाला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार