परळीचे 'सुवर्णकाररत्न' रमेश मुंडीक यांचा सामाजिक योगदानाबद्दल धारासुर गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार

 परळीचे 'सुवर्णकाररत्न' रमेश मुंडीक यांचा सामाजिक योगदानाबद्दल धारासुर गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार


परळी वैजनाथ, प्रतिनिधी
    परळी येथील सर्व परिचित सुवर्णकार व 'सुवर्णकाररत्न' पुरस्काराने सन्मानित असलेले रमेश मुंडीक यांच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांच्या मूळ गावी धारासुर येथे आयोजित वार्षिक सप्ताहात गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.
      धारासुर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू झाला असून प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा सुरू आहे. या भव्य दिव्य सोहळ्यात परळी येथे आपल्या सामाजिक कार्यातून वेगळा ठसा उमटवलेले व 'सुवर्णकाररत्न' पुरस्काराने सन्मान झालेले रमेश मुंडे धारासुरकर यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर रमेश मुंडीक यांनी गावातील विविध धार्मिक कार्यक्रमात अत्यंत आवश्यक असणाऱ्या पन्नास हजार रुपयांच्या मृदंगाच्या दोन घोड्या दान दिल्या. यावेळी रमेश मुंडीक व परिवाराच्या वतीने श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन व भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास धारासुर व पंचक्रोशीतील भाविक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार