इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

सुरश्री संगीत विद्यालयाचे घवघवीत यश

 सुरश्री संगीत विद्यालयाचे घवघवीत यश





सौ. मीना सोमवंशी यांनी विद्यालयासह केंद्रात प्रथम येण्याचा पटकावला बहुमान


अंबाजोगाई, प्रतिनिधी:-


  अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ ,वाशी मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या नोव्हेंबर-डिसेंबर 2023  परीक्षेत सौ. मीना सोमवंशी   यांनी घवघवीत यश संपादन केले. संपूर्ण भारतामध्ये व भारताबाहेरील अनेक देशांमध्ये शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार परीक्षेच्या माध्यमातून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ वाशी, मुंबई मार्फत केला जातो. नोव्हेंबर-डिसेंबर 2023 दरम्यान झालेल्या संगीत विशारद पूर्ण  परीक्षेत सौ.मीना सोमवंशी यांनी  सुरश्री संगीत विद्यालय आंबेजोगाई येथून फॉर्म भरून परीक्षा देऊन  सुयश प्राप्त केले आहे. बालगंधर्व संगीत महाविद्यालय अंबाजोगाई केंद्र तसेच सुरश्री संगीत विद्यालय या दोन्हीमध्ये सर्वप्रथम येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. संगीत विशारद पूर्ण परीक्षेसाठी सुरश्री संगीत विद्यालयाचे संस्थापक-संचालक  संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.ते पंडित शिवदासजी देगलूरकर यांचे शिष्य आहेत.

सुरश्री संगीत विद्यालयातून अनेक विद्यार्थी प्रारंभिक परीक्षा ते अलंकार परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. सुरश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी परीक्षात्मक व स्पर्धात्मक

यश संपादन केलेले आहे .या संगीत विद्यालयातून  शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचारासह विद्यार्थी घडवण्याचे कार्य सुरू आहे.

    सौ.मीना सोमवंशी व सुरश्री संगीत विद्यालयाच्या यशाबद्दल विद्यालयाचे संचालक प्रा. शंकर सिनगारे, संचालिका प्रा.मंजुश्री  सिनगारे 

तसेच कार्यकारिणी सदस्य सिने-नाट्य दिग्दर्शक प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे, बालासाहेबजी इंगळे, डॉ. रमेश इंगोले,डॉ. बबन मस्के,  राम घोडके , रवी शिंदे , विनायक घुले,संपादक रानबा गायकवाड, प्रा. रवींद्र जोशी,विकास वाघमारे, बा. सो. कांबळे,जीवनराव  घाडगे तसेच जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च मा. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सी. व्ही. गायकवाड यांचेसह विद्यालयाचे आधारस्तंभ हभप दशरथ महाराज बर्दापूरकर यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!