शिक्षणप्रेमी साहित्य रसिकांना मिळणार अभूतपूर्व मेजवानी

 परळीत 11 फेब्रुवारी रोजी रंगणार 6वे  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन



शिक्षणप्रेमी साहित्य रसिकांना मिळणार अभूतपूर्व मेजवानी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या   6 व्या  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनात साहित्य रसिकांना दर्जेदार साहित्यिकांची साहित्यिक मेजवानी मिळणार असून या एक दिवसीय साहित्य संमेलनास साहित्यिक,शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे मुख्य संयोजक रानबा गायकवाड व स्वागत समितीने केले आहे.

      परळी येथे साप्ताहिक शिक्षण मार्गाच्या वतीने 6 वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. संत तुकोबाराय साहित्य नगरी, औद्योगिक वसाहत सभागृह येथे होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ञ ए.तु. कराड हे आहेत. संमेलनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त लेखक, दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या हस्ते होणार आहे. तर नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव व कै. रामभाऊ अण्णा खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खाडे हे स्वागत अध्यक्ष आहेत.

     या एकदिवसीय संमेलनाचे उद्घाटन 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10  वाजता होणार आहे . संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण उपसंचालक व्ही. के. खांडके, माजी शिक्षक साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष विश्वंभर वराट, बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे, शिक्षक नेते पी. एस. घाडगे, परळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम कनाके, अंबाजोगाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने( काळे ), महात्मा फुले शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन बंडू आघाव उपस्थित राहणार आहेत.

    पहिल्या सत्रात उद्घाटन समारंभात मराठवाड्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक शिक्षिकांचा शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच स्मृतीशेष समाजभूषण विजयकुमार गंडले यांच्या स्मृती प्रित्यर्थ पहिला  राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.अभिमान मुंडे आणि ज्योती मुळे लिखित 'भाषण क्रांती' पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात दुपारी 2 ते 3  पर्यंत होणाऱ्या परिसंवादात साहित्यिक तथा विचारवंत अजयकुमार गंडले यांच्या अध्यक्षतेखाली वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर चे प्राचार्य डॉ. अरुण दळवे आणि जिल्हा परिषद प्रशाला आडोळा, तालुका माजलगाव येथील पुरुषोत्तम जाधव सहभागी होणार आहेत. 'खाजगीकरणाच्या विळख्यात  मराठी शाळांचा श्वास गुदमरतोय' व 'मराठी साहित्य आणि शिक्षकांची भूमिका' हे परिसंवादाचे विषय आहेत. परिसंवादाचे सूत्रसंचालन अभिमान मुंडे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अशोक नावंदे करणार आहेत.

    तिसऱ्या सत्रात दुपारी 3 ते 4  यादरम्यान कथाकथन होणार आहे. यामध्ये ग्रामीण कथाकार रमेश मोटे, युवा कथाकार प्रा. डॉ. सागर कुलकर्णी आपल्या कथा सादर करतील. तर कथाकथन च्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कथाकार सिद्धेश्वर इंगोले राहणार आहेत. सूत्रसंचालन प्रा. संजय आघाव व आभार प्रदर्शन केशव कुकडे करतील.

   दुपारी 4 ते 6 या वेळेत सत्र 4 थे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी प्राचार्य अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे होणार आहे. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.राजकुमार यल्लावाड  व शाहीर अनंत मुंडे करणार आहेत. कवी संमेलनात विश्वंभर वराट, नागनाथ बडे, प्रा. डॉ.मुकुंद राजपंखे, राजेश रेवले, नागोराव तिपलवाड, बालाजी मुंडे, विद्याधर पांडे, दत्ता वालेकर, देवराव चामनर, भवनराव देशमुख, भारत सालपे, सखा गायकवाड, प्रकाशसिंग तुसाम, दिवाकर जोशी, प्रा डॉ.सिद्धार्थ तायडे, बा. सो. कांबळे, प्रा.संजय आघाव, श्रीकृष्ण चाटे, गणपत कांदे, रंगनाथ मुंडे, सिद्धेश्वर इंगोले, केशव कुकडे, गणपत गणगोपालवाड, विजया दहिवाळ, संध्या शिंदे, सुनीता कोम्मावार, तीलोत्तमा  इंगोले, प्रा. अर्चना चव्हाण, रागिणी अंबाड, सतीश जाधव, नितीन ढाकणे, गोविंद हाके ,बालाप्रसाद चव्हाण, मोहन राठोड, प्रा. किशन शिनगारे, रामचंद्र कागणे, प्रा डॉ. चंद्रकांत जोगदंड, गंगाधर क्षीरसागर,आदि कवींच्या दर्जेदार  कविता रंगणार आहेत.

   सायंकाळी 6  ते 7  संमेलनात  काही ठराव संमत करण्यात येणार आहेत. संमेलनाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे. या संमेलनास शिक्षक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागत समितीचे शिवाजीराव बनसोडे, अजय कुमार गंडले, मुख्याध्यापक जी. बी. शेख नागनाथ बडे, प्राचार्य अतुल दुबे, प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे,बालासाहेब इंगळे, मुख्याध्यापक अशोक नावंदे, सौदागर कांदे, प्रा. विलास रोडे, मुख्याध्यापक शास्त्री कांबळे, मुख्याध्यापक के. डी. कांदे, प्रोफे.डॉ.माधव रोडे, केंद्रप्रमुख सतीश कारेपुरकर, सिद्धेश्वर इंगोले, विलास ताटे,बा. सो.कांबळे, सुभाष सवई, अंकुश फड, सौ. अनिता गर्जे, दिवाकर जोशी, गणेश खाडे, मुख्याध्यापक किरण आटोळकर, विठ्ठलराव झिलमेवाड, विकास वाघमारे, नवनाथ दाने, पत्रकार महादेव गीते, विद्याधर शिरसाठ, विनायक काळे आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !