युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

डॉ. तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांची प्रतिवर्षी वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त सेवा

 प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गहिनीनाथ गडावर नेहरकर दाम्पत्याकडून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी



डॉ. तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांची प्रतिवर्षी वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त सेवा


पाटोदा (प्रतिनिधी) - संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने डॉ.तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांच्या वतीने याही वर्षी संत वामनभाऊ समाधी मंदिरावर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. 


मूळ घाटशीळ पारगाव येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते तथा जागतिक आरोग्य सल्लागार डॉ.तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई तुकाराम नेहरकर या दाम्पत्याने संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हेलिकॉप्टरमधून समाधीस्थळी पुष्पवृष्टी करण्याचा पायंडा सुरू केला आहे. 


शनिवारी (दि.03) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते समाधी स्थळी मानाची महापूजा करण्यात आली, यावेळी प्रथमच वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर हे ही उपस्थित होते. 


दरम्यान पुण्यतीथी सोहळ्याची सांगता काल्याच्या हरिकीर्तनाने झाली. यावेळी संत वामनभाऊ यांच्या समाधीवर 11.45 वा नेहरकर दाम्पत्याने आयोजित केलेल्या हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात आली. 


या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील विविध विकासाच्या 23 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. संत वामानभाऊंचे हे तिर्थस्थळ अत्यंत पवित्र व चैतन्यमय असल्याचे म्हणत स्थळी हेलिकॉप्टर द्वारे केलेल्या पुष्पवृष्टीचे श्री फडणवीस यांनी विशेष असे कौतुक करून नेहरकर दाम्पत्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 


तसेच कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील नेहरकर दाम्पत्याच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या