गायकवाड, साबणे ,फुटके ,ढाकणे, शिंदे, जोशी, आरबुने या पत्रकारांचा मूकनायक पुरस्काराने सन्मानित

 अस्तित्व आणि अस्मितेसाठी मूकनायक दिशादर्शक-डॉ. सिद्धार्थ तायडे


मूकनायक पत्रकारितेतील एक ऐतिहासिक अध्याय-  मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये


समाजासाठी पत्रकार आणि पोलीस दोघांचेही कामे  महत्त्वाचे- पो नि उस्मान शेख


गायकवाड, साबणे ,फुटके ,ढाकणे, शिंदे, जोशी, आरबुने या पत्रकारांचा मूकनायक पुरस्काराने सन्मानित




परळी /प्रतिनिधी  

    

अस्तित्व आणि अस्मितेसाठी महामानव, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले वर्तमानपत्र मूकनायक आजही दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन प्रख्यात

 लेखक-दिग्दर्शक प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे  यांनी केले. ते मूकनायक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

तर मूकनायक पत्रकारितेतील एक ऐतिहासिक अध्याय असल्याचे मत परळी औष्णिक विद्युत  केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांनी केले. संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख म्हणाले की, समाजासाठी पत्रकार आणि पोलीस दोघांचेही कार्य अतिशय महत्त्वाचे असून ते समाजाचे मार्गदर्शक बनू शकतात.


परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने दि. ३१ जानेवारी रोजी परळी येथील व्हीआयपी रेस्ट हाऊस हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मूकनायक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी औष्णिक विद्युत विद्युत  केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक उस्मान शेख, वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात डॉ. अर्शद शेख, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, समाज कल्याण अधिकारी शरद राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

     याप्रसंगी परळी शहरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा मूकनायक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये दैनिक सम्राटचे प्रतिनिधी रानबा गायकवाड यांना जीवनगौरव, उत्कृष्ट जेष्ठ संपादक पुरस्कार दैनिक परळी प्रहारचे संपादक राजेश साबणे, उत्कृष्ट सांस्कृतिक वार्ता पुरस्कार दैनिक पुढारीचे प्रा.रवींद्र जोशी, दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधी धनंजय आरबुने यांना रिपोर्टर ऑफ द इयर पुरस्कार, उत्कृष्ट शोध वार्ता पुरस्कार दैनिक सकाळचे प्रा. प्रवीण फुटके, उत्कृष्ट सामाजिक वार्ता पुरस्कार दैनिक गावकरीचे जगदीश शिंदे तर उत्कृष्ट युवा संपादक पुरस्कार  नितीन ढाकणे यांनी देण्यात आला,ह्या पुरस्काराचे स्वरूप  स्मृतिचिन्ह ,पेन व प्रत्येकी 1 हजार रुपये रोख असे होते. 

Click:■ *Live :परळी वैजनाथ: मूकनायक पुरस्कार वितरण सोहळा*

     याप्रसंगी डॉ अनिल काठोये, डॉ अर्शद शेख, पोलीस निरीक्षक उस्मान शेख, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.  तर अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ सिद्धार्थ तायडे यांनी केला. पुरस्कार प्राप्त  रानबा गायकवाड आणि प्रा. प्रवीण फुटके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्य संयोजक भगवान साकसमुद्रे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या मूकनायक वृत्तपत्रास 104 वर्ष  होत आहेत. त्या अनुषंगाने मूकनायक  दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजनाचे महत्त्व विशद केले.

 मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रथम महिला संपादिका तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

तसेच या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते  दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

      मूकनायक दिन पुरस्कार सोहळा प्रसंगी परळी शहरातील विविध वर्तमानपत्रांचे संपादक, पत्रकार, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन कवी बा. सो. कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीतील जेष्ठ पत्रकार ओम प्रकाश बुरांडे, पत्रकार भगवान साकसमुद्रे, संपादक बाळासाहेब फड,परमेश्वर मुंडे , पत्रकार सय्यद अफसर व लक्ष्मण वैराळ यांनी परिश्रम घेतले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार