ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये लावण्याई पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन: सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदेही राहणार उपस्थित

 ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये लावण्याई पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन:  सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदेही राहणार उपस्थित



परळी वैजनाथ ,  प्रतिनिधी......

 परळी वैजनाथ येथील डी एस एम प्रतिष्ठान संचलित लावण्याई पब्लिक स्कूलचे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या व लगन या मराठी  चित्रपटातील  सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदे (राजनंदिनी) त्यांच्या उपस्थितीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन- 2024 दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पत्रकार अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.

 या कार्यक्रमांमध्ये या शाळेचे चिमुकले विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्याताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला सकारात्मक पत्रकारितेतून महाराष्ट्रात नवा मापदंड निर्माण करणारे बीड जिल्ह्यातील सृजनशील,जेष्ठ पत्रकार दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर, परळी शहराचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, दिव्यांग मंत्रालयातील उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, नांदेड येथील महात्मा गांधी मिशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ.सौ. भाग्यश्री कुलकर्णी-कापरे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद तुरुकमारे, भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे, ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे, दिव्य मराठीचे बीड येथील उपसंपादक अमोल मुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम परळी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर होणार आहे.या कार्यक्रमाला शहरातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गिरवलकर, अध्यक्ष अनंत कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी एस.एस.आयाचित, मुख्याध्यापिका कविता विर्धे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !