इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

विद्वानांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

परळीत २,३,४ फेब्रुवारी रोजी महर्षी दयानंद  द्विजन्मशताब्दी सोहळा  



  विद्वानांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

परळी वैजनाथ -३०-

 

        समग्र क्रांतीचे अग्रदूत व थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात येत्या २,३ व ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय आर्य नेते व प्रसिद्ध विद्वानांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात द्विजन्मशताब्दी सोहळयाचे  आयोजन  होत आहे.

            महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व आर्य समाज परळीच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या  कार्यक्रमात तिन्ही दिवस विविध विषयावरील संमेलने, योग शिबिर ,वेदपारायण यज्ञ ,भव्य शोभायात्रा, प्रबोधनपर व्याख्याने ,गुरुकुल वार्षिकोत्सव , शतायुषी तपस्वी व्यक्तिमत्व श्री स्वामी सोममुनिजी गौरव, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व अभ्यासू व्यक्तिमत्त्वांचा सत्कार असे कार्यक्रम पार पडतील. या कार्यक्रमास दिल्ली येथील वरिष्ठ आर्य नेते श्री विनय आर्य, प्रकाश आर्य, वैदिक विद्वान सर्वश्री प्रा. सोनेरावजी आचार्य (पुणे) पं. प्रियदत्त शास्त्री ( हैदराबाद) , पं. राजवीर शास्त्री (सोलापूर), पं. सत्यवीर शास्त्री (अमरावती ),महेश वेलानी ( मुंबई) हे उपस्थित राहणार असून त्यांचे मौलिक मार्गदर्शन  लाभणार आहे . तसेच हैदराबाद येथील वैदिक विदुषी आचार्या सविता यांचा मधुर भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

     या कार्यक्रमास राज्यातील विविध भागातून आर्य समाजाचे कार्यकर्ते व महर्षी दयानंदांचे  अनुयायी बहुसंख्येने येणार असून कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.

            तरी या राज्यस्तरीय कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान योगमुनी,  मंत्री राजेंद्र दिवे, आर्य समाजाचे प्रधान  जुगलकिशोर लोहिया ,मंत्री उग्रसेन राठौर, कोषाध्यक्ष देविदासराव कावरे आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!