इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

दहावी-बारावीची कॉपीमुक्त परीक्षा!

 दहावी-बारावीची कॉपीमुक्त परीक्षा! प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठीही भरारी पथके; यंदा सरमिसळ पद्धत अन्‌ दहा मिनिटे जादा वेळ





इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, म्हणून यंदा बोर्डाने प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल.
            अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून १०० टक्के निकालासाठी परीक्षेवेळी भरारी पथकांचा अंदाज घेऊन वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगितली जातात ही वस्तुस्थिती आहे. अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची खात्री असलेल्या शाळांमध्येच प्रवेश घेतात अशीही स्थिती आहे. त्यासंदर्भातील तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे अनेक शाळांची चिंता वाढली आहे.

पण, विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेची चिंता न करता, प्रश्नांचा सराव व नोट्‌स काढून त्याच्या अभ्यासावर भर दिल्यास परीक्षा सोपी जाईल, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. दहावी-बारावीतील गुण म्हणजे आयुष्य नव्हे, हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. पालकांनीही अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू नये. परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी पुरेशी झोप घेऊन पहाटेच्या सुमारास अभ्यास केल्यास तो लक्षात राहातो, असेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

ठळक बाबी...

• - इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या कालावधीत

• - इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा १० ते २९ फेब्रुवारीपर्यंत

• - इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चपर्यंत चालणार

• - दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत

यंदा सरमिसळ पद्धत अन्‌ दहा मिनिटे जादा वेळ

कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत एकाच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षेसाठी असणार आहेत. पूर्वी एकाच शाळेतील विद्यार्थी एकामागे एक यायचे आणि त्यातून कॉपी करून किंवा एकमेकांचे पाहून उत्तरे लिहिली जायची. आता हा प्रकार बंद होईल. दुसरीकडे विद्यार्थ्यांना पेपर सुरू झाल्यावरच प्रश्नपत्रिका मिळेल, पण शेवटी १० मिनिटांचा वेळ जादा दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे बंधन असणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!