दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली !!

 राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

        येथील नेहरू चौकातील मेघराज हॉटेलचे मालक भरत सोमवंशी,मेघराज सोमवंशी,शत्रुघ्न सोमवंशी यांच्या मातोश्री राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी यांचे वार्धक्याने आज दि.5 फेब्रुवारी रोजी सायं.5.30 वा.सुमारास निधन झाले.मृत्युसमयी त्या 95 वर्षे वयाच्या होत्या. पत्रकार महादेव शिंदे यांच्या त्या मावशी होत.

      नेहरु चौक भागातील बाजीप्रभुनगर येथील रहिवाशी राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी  या अतीशय मनमिळाऊ होत्या. वयोमानापरत्वे वयाच्या  95  व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने सोमवंशी व शिंदे परिवाराचा आधारवड कोसळला आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने  सोमवंशी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

        दरम्यान, दिवंगत राणूबाई  सोमवंशी यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.6 रोजी सकाळी 10 वा.मोक्षधाम स्मशानभूमी परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाजीप्रभुनगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार