ज्योतिर्लिंग स्थानाबाबत पुन्हा खोडसाळपणा: राहुल गांधीच्या वृत्तांकनात झारखंडच्या वैद्यनाथ धामचा ज्योतिर्लिंग म्हणून उल्लेख

 ज्योतिर्लिंग स्थानाबाबत पुन्हा  खोडसाळपणा: राहुल गांधीच्या वृत्तांकनात झारखंडच्या वैद्यनाथ धामचा ज्योतिर्लिंग म्हणून उल्लेख


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
          काँग्रेस नेते राहुल गांधी हे झारखंड येथील वैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी गेले होते. राष्ट्रीय वृत्तवाहिन्या यांनी वैद्यनाथ धाम चा उल्लेख बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असा केला परंतु यामध्ये महाराष्ट्रातील मराठी मीडियाने सुद्धा कोणतीही कसर न ठेवता व कुठलाही विवेक जागृत न ठेवता सरळ सरळ ज्योतिर्लिंग म्हणून झारखंड येथील वैजनाथ धामचाच उल्लेख करून वृत्तांकन केल्याने परळीतील शिवभक्त व तमाम महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये या मीडियाचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.
         बारा ज्योतिर्लिंगाचा उल्लेख करत असताना अनेक वेळा जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील पंचम ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ चा उल्लेख टाळला जातो. हा मुद्दा वारंवार पुढे येत असतो. सर्व शास्त्रसंमत व धर्मशास्त्रसंमत त्याचबरोबर सर्व ऐतिहासिक पुरावे, सर्व शंकराचार्य व साधू समाजाचे मतप्रवाह हे पंचम ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील परळी वैजनाथ येथील वैद्यनाथच आहे. असे असतानाही आणि संपूर्ण महाराष्ट्र सह देशातील सर्वांनाच याबाबतीत माहिती असताना वारंवार झारखंड येथील वैद्यनाथ धामला ज्योतिर्लिंग स्थान बिंबवण्याचा खोडसाळपणा केला जातो. यामध्ये महाराष्ट्रातील काही अमहाराष्ट्रीयन मालक असलेली वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या यांचे भान हरपले जाते. 

सर्वांना विदीत असतानाही मुद्दाम हे केले जाते निदान महाराष्ट्रातील प्रसार माध्यमे म्हणून तरी अस्मिता जागृती ठेवण्याऐवजी मराठी प्रसार माध्यमे ही अशा प्रकारचा खोडसाळपणा वारंवार करतानाची अनेक उदाहरणे पुढे आलेली आहेत. यात आज काँग्रेस नेते राहुल गांधी वैद्यनाथ धाम येथे दर्शनाला गेले होते. याचे वृत्तांकन करतानाही देवघरला ज्योतिर्लिंग स्थान असा उल्लेख करून काही मराठी मीडियानेही आपला कोतेपणा दाखवून दिला आहे. याचे तीव्र पडसाद उमटत असून शिवभक्तांनी या संबंधित वृत्तवाहिन्या व प्रसार माध्यमे यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार