पांगरी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीर

 फेसबुकवरुनच रोज बाय बाय...

       सांग तुला गावाकडे यायचे का नाय..



    ........कवी अरुण पवार



पांगरी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात कवी अरुण पवारांनी दिली बहारदार कवितांची मेजवानी


परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)

             लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने पांगरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष युवती शिबीराचे आयोजन सोमवार (ता.२९) ते रविवार (ता.०४) दरम्यान करण्यात आले आहे. शिबीराच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिध्द कवी अरुण पवारांच्या काव्य मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते.काव्य मैफीलीस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

                 काव्य मैफीलीच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विनोद जगतकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमास कवी अरुण पवारसह, माऊली मुंडे पाटील, डॉ प्रविण दिग्रसकर, डॉ राजर्षी कल्याणकर, डॉ रंजना शहाणे, प्रा. विणा भांगे, प्रा विशाल पौळ, प्रा डॉ विलास देशपांडे, मुख्याध्यापिका श्रीमती विभुते, नागभूषण फुलारी उपस्थित होते. यावेळी कवी अरुण पवार यांनी आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की, मी जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर, लोकनेते शरद पवार, स्वर्गीय पानसरे यांच्या समोर कविता सादर करण्याचे भाग्य मिळाले. अरुण पवार यांनी कविता सादर करताना म्हणाले की,

                फेसबुकवरुनच रोज बाय बाय

       सांग तुला गावाकडे यायचे का नाय...

       शेजारच्या सखीचे कालच वाजलं

       तालुक्यात गावाचे नाव गाजलं....

        सखीच झालं तुझं व्हयचंका नाय...

       सांग तुला गावाकडे येयच का नाय...

 या कवितेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच झाकून जाईल...गं.. गालावरचा तीळ.. व  आई-वडीलावरील वाटणी कवितेने विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. तसेच संवाद हरवत चालल्याबदल चिंता व्यक्त केली. अरुण पवार यांनी कविता सादर करताना विद्यार्थ्यांना हसवत-हसवत डोळ्यात अश्रू आणले. अध्यक्षीय समारोप डॉ प्रविण दिग्रसकर यांनी केला. कार्यक्रमास विद्यार्थी, पांगरी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !