पोस्ट्स

धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS:शिक्षक मतदार संघ पुन्हा संघटनेच्या अधिपत्याखाली आणणार - सुर्यकांत विश्वासराव

इमेज
  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचा खरा दावेदार मराठवाडा शिक्षक संघच - पी.एस.घाडगे   शिक्षक मतदार संघ पुन्हा संघटनेच्या अधिपत्याखाली आणणार - सुर्यकांत विश्वासराव    परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचा खरा दावेदार मराठवाडा शिक्षक संघच आसून 30 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत संघटनेने उमेदवारी दिलेल्या सुर्यकांत विश्वासराव यांना निवडून आणून दावेदारीवर शिक्कामोर्तब करावे असे प्रतिपादन संघटनेचे मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष पी.एस. घाडगे यांनी केले तर  हा मतदार संघ पुन्हा संघटनेच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी पुर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आसल्याचे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष तथा उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी केले.                                      परळी येथील कॉ.वैजेनाथराव भोसले सांस्कृतिक सभागृहात मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकाणीची विस्तारित बैठक रविवार (दि.1) जानेवारी रोजी संपन्न झाली यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना घाडगे व विश्वासराव यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. 30 जानेवारी 2023 रोजी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या

MB NEWS:किसान सभा प्रकल्पग्रस्त शेतकरी पुत्रांच्या पाठीशी - कॉ अजय बुरांडे

इमेज
  किसान सभा प्रकल्पग्रस्त शेतकरी पुत्रांच्या पाठीशी - कॉ अजय बुरांडे परळी / प्रतिनिधी कायम उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या जमिनी देणाऱ्या शेतकरी पुत्रांना आपल्या हक्कासाठी दहा दिवस उपोषण करूणही प्रश्न सुटत नाहीत ही बाब निंदणीय आहे. सरकारनी तात्काळ याकडे लक्ष देउन प्रकल्पग्रस्त शेतकरी पुत्रांचा प्रश्न सोडविण्याची मागणी करूण चालु असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य किसान सभेचा पाठींबा राहील असे आश्वासन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ अजय बुरांडे यांनी दिला आहे. दहा दिवसा पासुन परळी विज निर्मीती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकरीपुत्र उपोषणास बसले आहेत. प्रकल्पग्रस्तांना कायम सेवेत सामावून घ्यावे, ४५ वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता ३० हजार रुपये करावा, चंद्रपूर पाॅवर स्टेशन येथे प्रकल्पग्रस्तांचे दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत या मागण्यांसाठी हे आंदोलन चालु आहे. या आंदोलनास  सोमवारी (ता.२) किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ अजय बुरांडे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ भानुदासबप्पा देशमुख डिवायएफआय चे जिल्हाध्यक्ष कॉ विशाल देशमुख, कॉ मदन वाघमारे यांनी भेट देउ

MB NEWS:मागण्या तात्काळ मान्य करा - जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे

इमेज
  प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा  मागण्या तात्काळ मान्य करा - जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे परळी वै (प्रतिनिधि)  औष्णिक विद्युत केंद्र समोर प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू आहे. उपोषणाला संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तात्काळ मान्य करा मागील अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त कामगार परळी औष्णिक विद्युत केंद्रात कामावर आहेत जमिनी हस्तांतरित करताना प्रकल्पग्रस्तांना लेखी आश्वासन दिलेलं होतं संपादित जमिनधारक कुटुंबातील एका व्यक्तीला आम्ही नोकरीमध्ये सामावून घेऊ पण गेल्या अनेक वर्षापासून औष्णिक विद्युत केंद्रांनी ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी वारंवार लेखी पाठपुरावा केला तरी पण त्यांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे परळी येथे औष्णिक विद्युत केंद्रात समोर प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू आहे. या उपोषणाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने बीड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला याप्रसंगी संभाजी ब्रिगेडची बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव सर, तालुका अध्यक्ष  देवराव लुगडे महाराज, मराठा सेवा संघ ता

MB NEWS:केंद्र सरकारचा मोठा निर्णय :प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य

इमेज
  केंद्र सरकारचा मोठा निर्णय : प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य          कोविड महामारीची नवी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने १ जानेवारीपासून चीनसह या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी  या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांनी 1 जानेवारीपासून कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह सादर करणे आवश्यक आहे.          मांडविया म्हणाले की, या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी RT-PCR चाचणीचा नकारात्मक COVID अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल. ते म्हणाले की, प्रवासाच्या ७२ तासांच्या आत कोविड चाचणी करावी लागेल. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमानतळावरील यादृच्छिक चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे, परंतु प्रवाशांनी विमानात चढण्यापूर्वी RT-PCR अहवाल सादर करणे आवश्यक आहे. Click: MB NEWS च्‍या youtu.be चॅनलला भेट

MB NEWS:परचुंडी उपसरपंचपदी सौ. सीमा परमेश्वर थोरात

इमेज
  परचुंडी उपसरपंचपदी सौ. सीमा परमेश्वर थोरात  परळी/प्रतिनिधी  प्रसिद्ध छायाचित्रकार भीमाशंकर नावंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप च्या सौ सीमा परमेश्वर थोरात या  4 विरुद्ध शून्य मताने विजयी झाल्या. परचुंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.मीना गुरूलिंगअप्पा नावंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली सदस्य  सौ.छाया रामराव सरांडे,  सौ सीमा परमेश्वर थोरात व मारोती राघु थोरात  यांच्यासह सरपंच सौ मीना गुरुलिंग नावंदे यांनी  सौ सीमा परमेश्वर थोरात यांना मतदान केल्याने व विरोधी बाजूने शून्य मतदान झाल्याने सौ सीमा परमेश्वर थोरात  4 विरुद्ध 0 मताने विजयी घोषित करण्यात आल्या.निवडणूक निरीक्षक म्हणून श्री शुभम मोठेवाड तर  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गोरे डी डी यांनी काम पाहिले.  त्यांच्या विजयाने परचुंडी ग्रामपंचायत ही महिलांच्या हातात आली असून या ठिकाणी सरपंच उपसरपंचपदी महिलाच आहेत हे विशेष. दरम्यान या निवडी नंतर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

MB NEWS:धम्मपाल भूतके यांच्या पुढाकाराने जयस्तंभ प्रतिकृती बनले मुख्य आकर्षण

इमेज
  भीमा कोरेगाव शौर्यदिना निमित्त परळीत ५०० शूर वीरांना मानवंदना धम्मपाल भूतके यांच्या पुढाकाराने जयस्तंभ प्रतिकृती बनले मुख्य आकर्षण परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         परळी येथील रेल्वे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील मैदानावर भीमा कोरेगाव २०५ वा शौर्य  दिनानिमित्त परळीत ५०० शूरवीरांना मानवंदना देण्यात देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी परळी शहरातील समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, सम्राट अशोक विचार मंच आदी संघटना व विविध आंबेडकरी चळवळीतील पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.    या अभिवादन कार्यक्रमासाठी  ऑल इंडिया पॅंथर सेना , परळीचे युवा तालुकाध्यक्ष धम्मपाल भूतके यांच्या पुढाकाराने भीमा कोरेगाव जयस्तंभ प्रतिकृती उभी करण्यात आली होती. त्यास आकर्षक फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती.           ऑल इंडिया एस सी/एस टी रेल्वे एम्पलईज असोसिएशन परळी वैजनाथ चे अध्यक्ष गौतम आचार्य, सचिव बालाजी देवडे, प्रा. दासू वाघमारे सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे, सुभाष सवाई, शिवाजी बनसोडे सर, अशोक वाघमारे,  व

MB NEWS:■ अभिष्टचिंतन-सहकार क्षेत्रात उंच भरारी घेणारे व्यक्तीमत्व:पवनराजे अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद सावंत

इमेज
 ●  सहकार क्षेत्रात उंच भरारी घेणारे व्यक्तीमत्व: पवनराजे अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद सावंत ______________________________________ ●सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व ●प्रल्हाद सावंत यांचा परळीत मोठा जनसंपर्क ●कोरोना लॉकडाऊनमध्ये बँकेची केली स्थापना ●सचिव गोविंद भरबडे व उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे यांची मोलाची साथ* ●परळीतील ग्राहक वर्ग पवनराजे बँकेकडे  आकर्षित ●दीड वर्षात दहा कोटींच्या आसपास ठेवी जमा ______________________________________ ए का अतिशय ग्रामिण व फारसे शैक्षणिक वातावरण नसलेल्या कुटूंबातून एक मुलगा परळीत येतो, काही शिक्षण घेतो आणि शिकण्यासोबत जगण्यासाठी नोकरी करतो...एवढ्यावरच न थांबता प्रामाणिक नोकरीवर सामान्यांचा विश्वास संपादन करीत 10 कोटी रूपये उलाढाल असलेल्या अर्बन बँकेचा संस्थापक अध्यक्ष होतो असे म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही. परंतू प्रल्हाद रंगनाथ सावंत हा आपल्यातीलच एक तरूण या संघर्षातून घडला असून सुरूवातीच्या या ओळी त्यासाठीच लिहिल्या आहेत. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे हे वाटत असले तरी प्रल्हाद सावंत मात्र अगदी असा आणि असाच पुढे पुढे जात राहिल

MB NEWS;नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; व्यावसायिक गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

इमेज
  नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; व्यावसायिक गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला     :  नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. ताज्या दरवाढीनंतर दिल्लीतील गॅस सिलेंडरचे दर 1768 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे मुंबईत हे दर 1721 रुपये इतके झाले असून कोलकाता व चेन्नईमध्ये हेच दर क्रमशः 1,870 आणि 1,971 रुपयांवर गेले आहेत. Click: MB NEWS च्‍या youtu.be चॅनलला भेट द्या. Subscribe करा. तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर 1053 रुपये इतके असून मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत हेच दर क्रमशः 1052.5 रुपये, 1079 रुपये व 1068.50 रुपयांवर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी सरत्या वर्षात म्हणजे 2022 सालच्या मार्चमध्ये घरगुती गॅस सिलेंडर दरात 50 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर मे महिन्यात 50 आणि 3.50 रुपये अशी दोनदा वाढ केली होती तर जुलैमध्ये आणखी एकदा 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

MB NEWS:देवदहिफळ येथे श्री.खंडोबा मंदिरात खाडे कुटुंबियाकडून आकर्षक व मनमोहक पुष्पसजावट; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

इमेज
  देवदहिफळ येथे श्री.खंडोबा मंदिरात खाडे कुटुंबियाकडून आकर्षक व मनमोहक पुष्पसजावट; दर्शनासाठी भाविकांची गर्दी परळी वैजनाथ / धारूर (प्रतिनिधी) :- येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, खोबरे आणि भंडाऱ्याची उधळण करत भाविकांच्या उपस्थितीमध्ये देवदहिफळ येथे ग्रामदैवत खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी आज रविवार दि.1 जानेवारी रोजी श्री खंडोबा मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली होती. श्री खंडोबा मंदिरात प्रदीप खाडे अध्यक्ष-कै.रामभाऊ अण्णा खाडे सेवाभावी संस्था लातूर, सहसचिव- नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ व खाडे कुटुंबीयांच्या वतीने आकर्षक व मनमोहक अशी फुलाची मनमोहक पुष्पसजावट करण्यात आली आहे.           चंपाषष्ठी पासून देवदहीफळ येथे खंडेरायाची यात्रोत्सव दीड महिना भरते. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात देवदहिफळ येथे भाविक उपस्थित राहतात. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत श्री खंडोबा मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण झाले आहे. नवीन वर्ष व यात्रोत्सव निमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.          श्री.खंडोबा मंदिर,देव दहिफ

नंदनज ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा शिवकन्या योगीराज गुट्टे यांनी स्विकारला पदभार सौ सुनंदा शिवाजी गुट्टे यांची उपसरपंच पदी निवड

इमेज
  नंदनज ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा शिवकन्या योगीराज गुट्टे यांनी स्विकारला पदभार सौ सुनंदा शिवाजी गुट्टे यांची उपसरपंच पदी निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नंदनज ग्रामपंचायत निवडणूक २०२२ मध्ये सरपंच पदासाठी शिवकन्या योगीराज गुट्टे हया बहुमताने विजयी झाल्या होते, त्यांनी निवडून आल्यानंतर शुक्रवार दि.३० रोजी आपल्या पदाचा पदभार घेतला. याचवेळी झालेल्या उपसरपंच निवडीच्या बैठकीत एकमताने सौ सुनंदा शिवाजी गुट्टे  यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.       भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील नंदनज ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार शिवकन्या योगीराज गुट्टे यांच्यासह पाच उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत. श्री संत केदारेश्वर जनसेवा विकास पॅनलचे कै.योगीराज गुट्टे यांच्या पत्नी सरपंच शिवकन्या योगीराज गुट्टे यांच्यासह सदस्य म्हणुन सुनंदा शिवाजी गुट्टे, सतीश बाबुराव गायकवाड, नाथराव हरिभाऊ गुट्टे, देवशाला सोमनाथ गुट्टे, अरविंद बापूराव गुट्टे हे सर्व बहुमताने विजय झाले आहेत. शुक्रवारी दि.3

MB NEWS:सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध- गोविंद सोनवणे

इमेज
  सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ.युमना शिवाजी सोनवणे यांनी स्वीकारला पदभार  उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची  बिनविरोध निवड सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध- गोविंद सोनवणे अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व निर्माण केले आहे. सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ. युमना शिवाजी सोनवणे यांनी पदभार स्वीकारला तसेच  उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ. युमना शिवाजी सोनवणे व पॅनल प्रमुख गोविंद सोनवणे यांनी सांगितले.          ग्रामपंचायत निवडणूक 2022 संपन्न झाली आणि उपसरपंच यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यानुसार सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ. युमना शिवाजी सोनवणे यांनी पदभार स्वीकारला तर उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची एक मताने निवड करण्यात आल

MB NEWS:"जोशींची तासिका" होणार सन्मानित ;अनिरुद्ध जोशींना "वार्ता भूषण" पुरस्कार जाहीर

इमेज
  "जोशींची तासिका" होणार सन्मानित ;अनिरुद्ध जोशींना "वार्ता भूषण" पुरस्कार जाहीर परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...        येथील सर्वपरिचित मुक्त पत्रकार व स्तंभलेखक अनिरुद्ध जोशी यांना श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे मराठी साहित्य संमेलन अंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रातील वार्ता भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या निमित्ताने सर्वदूर प्रसिद्ध झालेल्या "जोशींची तासिका" या स्तंभाचा एक प्रकारे सन्मान होणार आहे.        श्रीनाथ मानव सेवा मंडळ  यांच्या वतीने सहावे मराठी साहित्य संमेलन दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथ्रा येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे या राहणार आहेत. तर युवा साहित्यिक, कवी दंगलकार डॉ. स्वप्नील चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील मान्यवर मसाप मराठवाड्याचे अध्यक्ष दगडू लोमटे, ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब आदी मा

MB NEWS:ए.तु. कराड यांचा एक जानेवारी रोजी सेवानिवृत्ती गौरव सोहळा

इमेज
  ए.तु. कराड यांचा एक जानेवारी रोजी सेवानिवृत्ती गौरव सोहळा परळी (प्रतिनिधी. )  नागपूर केंद्राचे केंद्रप्रमुख तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाबीचे मुख्याध्यापक ए.तु.कराड हे 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने दिनांक एक जानेवारी 2023  रोजी सेवानिवृत्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कराड सर आदर्श मुख्याध्यापक तसेच साहित्यिक तसेच सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत.        शहरातील सोमेश्वर नगर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी बारा वाजता या गौरव सोहळ्यास सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण कराड उपसचिव, मंत्रालय, मुंबई हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी सौ नम्रता चाटे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती शिवाजी मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत.     सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यास शिक्षक, प्राध्यापक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तसेच सर्व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाबी यांनी केले आहे.

MB NEWS:परळी वैजनाथ येथे श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ

इमेज
  परळी वैजनाथ येथे श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ हरीपाठ, भजन, कीर्तनाचेही आयोजन *परळी वैजनाथ (प्रतिनिधी) * परळी शहरातील कोष्टी समाज बांधवांच्या वतीने श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.30 डिसेंबर पासून या कार्यक्रमास भव्य प्रारंभ झाला असून या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठी उपस्थिती लाभत आहे. परळीतील गुरूकृपानगर येथील हरेगावकर यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सकाळी 7 ते 10 या वेळेत श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराणाचे पारायण करण्यात येत असून पारायणप्रमुख सौ.लताताई येळाये यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे. तर सायंकाळी 5 ते 7 या वेळेत  हरीपाठ, भजन, कीर्तन आदी धार्मीक कार्यक्रम संपन्न होत आहे.  शुक्रवारपासून सुरू झालेल्या या सर्व धार्मिक कार्यक्रमास भाविक-भक्तांची मोठी गर्दी होत आहे. सकाळच्या व संध्याकाळच्या सत्रातील व चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण व हरीपाठ, भजन, कीर्तन श्रवणासाठी शहरातील

MB NEWS:काँग्रेसकडून २०२४ च्या निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर

इमेज
  काँग्रेसकडून २०२४ च्या निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर नवी दिल्ली:  ‘भारत जोडो यात्रा’ सुरु झाल्यापासून एक प्रकारे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याच्या चर्चा घडत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रेला यश मिळताना दिसत आहे. त्यांच्या यात्रेने जवळ जवळ संपूर्ण भारत कव्हर केला आहे. दिल्लीनंतर ही यात्रा जानेवारीमध्ये पंजाबमध्ये दाखल होणार आहे. यात्रेने जवळपास १०० हून अधिक दिवसपूर्ण केले आहेत. या यात्रेनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या चर्चासुद्धा छेडल्या जात आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर केले आहे. (Congress PM Post Candidate) पुढील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत: केली. शुक्रवारी (दि.३०) पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कमलाना यांनी सांगितले की, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राहुल गांधी केवळ विरोधकांचा चेहराच नसतील तर विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उम

MB NEWS:डॉ दिगंबर दंडे यांच्या प्रथम स्मरणदिनामित्त 8 जानेवारी रोजी 'श्रीकृष्णार्पणमस्तु ' गौरव ग्रंथाचे परळीमध्ये प्रकाशन

इमेज
  डॉ दिगंबर दंडे यांच्या प्रथम स्मरणदिनामित्त 8 जानेवारी रोजी  'श्रीकृष्णार्पणमस्तु ' गौरव ग्रंथाचे परळीमध्ये प्रकाशन   ............................. परळी दिनांक 30 डिसेंबर प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील सामाजिक व शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीचे आधारस्तंभ प्रख्यात डॉ. दिगंबर जनार्दन दंडे उर्फ आबा यांच्या प्रथम स्मरणदिनानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित व  डॉ.दि .ज. दंडे प्रतिष्ठान आयोजित ' श्रीकृष्णार्पणमस्तु ' या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळा 8 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे.              या गौरव ग्रंथाचे प्रकाशन सामाजिक क्षेत्रातील भूषणावह व्यक्तिमत्व, पद्मभूषण अशोकजी कुकडे व  ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ वृषाली किन्हाळकर,  यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री डॉ माधवराव किन्हाळकर व अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता  डॉ.सुधीर देशमुख  उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ

MB NEWS:सामाजिक बांधिलकी: डॉ.दि. ज. दंडे प्रतिष्ठानच्या वतीने शाळेला संगणक भेट

इमेज
सामाजिक बांधिलकी: डॉ.दि. ज. दंडे प्रतिष्ठानच्या वतीने शाळेला संगणक भेट परळी वैजनाथ   30   (प्रतिनिधी) येथील डाॅ. दि जं दंडे  प्रतिष्ठानच्या वतीने  लावण्याई पब्लिक स्कूल  च्या  मुलांसाठी  संगणक  भेट देण्यात  आले. या वेळी मुंबई  हायकोर्ट  येथील ॲड. तेजस दंडे व डाॅ. विवेक दंडे  यांनी भविष्यात आम्ही  या शाळेसाठी सदैव  मदत करणार  असल्याचे  आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाला  प्रमुख पाहणे  म्हणुन अतुल नरवाडकर,  डाॅ विवेक दंडे ,मुंबई  हायकोर्ट चे वकील  ॲड.तेजस  दंडे, शाळेचेअध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनंत कुलकर्णी,  मुख्याध्यापक  अस्मिता गोरे  आदिंची उपस्थिती  होती . या कार्यक्रमाचे सुञसंचलन शाळेच्या उपमुख्याध्यपिका  पुजा बिडवे  यांनी केले ,तर आभारप्रदर्शन  कविता विर्धे  मॅडम  यांनी केले.  हा कार्यक्रम  यशस्वी  करण्यासाठी  हर्षदा  परदेशी,  संघमिञा पोटभरे,  शेख सर, अनुपमा डोडिया यांनी परिश्रम  घेतले. 

MB NEWS:शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून सूर्यकांत विश्वासराव हेच शिक्षक आमदारकीचे खरे दावेदार-अनुप कुसुमकर

इमेज
  शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून सूर्यकांत विश्वासराव हेच शिक्षक आमदारकीचे खरे दावेदार-अनुप कुसुमकर परळी,( प्रतिनिधी):- मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणुक नुकतीच जाहिर झाली असुन शिक्षकांच्या प्रश्वावर सातत्याने लढा देणारे मराठवाडा शिक्षक संघटनेचे अधिकृत उमेदवार सूर्यकांत विश्वासराव विजय निश्चित होणार असून सभागृहात असलेल्या प्रतिनिधी हा राजकिय पक्षाचा बांधील नसता तो केवळ शिक्षकांचा प्रतिनिधी असावा अशी प्रतिक्रिया मराठवाडा शिक्षण संघटना परळी तालुका अध्यक्ष अनुप कुसुमकर यांनी दिली. मागील अनेक वर्षापासून सातत्याने शिक्षकांच्या अनुदानाचे प्रश्न असतील वैयक्तिक मान्यतेचे प्रश्न,संस्थेचालककडून होणाऱ्या अन्याय बाबत शासन दरबारी वाचा फोडणे,जुनी पेन्शन योजना, प्रचलित नियमानुसार अनुदानाचा प्रश्न, तसेच एक नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेल्या विना अनुदानित,अंशतः अनुदानित सर्व शिक्षकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न अशा असंख्य प्रश्नासाठी खऱ्या अर्थाने रस्त्यावरची लढाई लढणारा एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे सूर्यकांत विश्वासराव हेच आहेत.जुन्या पेन्शन प्रश्नी सध्याच्या नागपूर अधिवेशन काळात लाखो

MB NEWS:कोष्टी समाज मंडळाच्या वतीने अंबाजोगाई येथे श्री चौंडेश्वरी महोत्सवास उत्साहात सुरुवात

इमेज
  कोष्टी समाज मंडळाच्या वतीने अंबाजोगाई येथे श्री चौंडेश्वरी महोत्सवास उत्साहात सुरुवात अंबाजोगाई/ प्रतिनिधी कोष्टी समाज मंडळाच्या वतीने अंबाजोगाई येथे श्री चौंडेश्वरी महोत्सवास आज शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई कोष्टी समाज मंडळाच्या वतीने श्री चौंडेश्वरी देवी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी मंदिर कोष्टी गल्ली अंबाजोगाई येथे दिनांक 30 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आठ दिवस श्री चौंडेश्वरी देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देवांग पुराण पारायण, भजन, कीर्तन, हरिपाठ ,जागरण गोंधळ आदि कार्यक्रम होणार आहे. आज शुक्रवारी सकाळी  श्री चौंडेश्वरी देवीची विधीवत पूजा  करण्यात आली. दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी श्री चौंडेश्वरी देवी महोत्सवाची सांगता पारायण समाप्तीनंतर होणार असून यानिमित्त देवांग पुराण ग्रंथ मिरवणूक अंबाजोगाई शहराच्या विविध मार्गावरून निघणार आहे. दररोज दु

MB NEWS:महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित मुंबईच्या(महानंद) संचालक पदी फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड

इमेज
  महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित मुंबईच्या(महानंद) संचालक पदी फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड निवडीबद्दल  सर्व स्तरातून अभिनंदन परळी, (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई म्हणजेच महानंद दूध डेरी च्या संचालक पदी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी इतर उमेदवारांनीआपले उमेदवारी अर्ज परत घेतल्यामुळे  फुलचंद कराड यांची सर्वसाधारण मतदार संघातून बिनविरोध निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.       परळी तालुका दूध उत्पादक व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित परळीचे चेअरमन तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांची महाराष्ट्र राज्य दूध महासंघ (महानंद) दूधडेरी च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.  ही निवड पुढील पाच वर्षापर्यंत राहणार आहे ग्रामपंचायत निवडणुकीमुळे महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मुंबईचे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. आज हा कार्यक्रम पूर्णपणे पार पडला असून फुलचंद कराड सर्वसाधारण गटातून बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडीबद

MB NEWS:युजीसीकडून नेट परीक्षेची तारीख जाहीर

इमेज
  युजीसीकडून नेट परीक्षेची तारीख जाहीर  सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षेची (नेट) तारीख युजीसीने (UGC NET JUN 2023) जाहीर केली आहे. ही परीक्षा 13 ते 22 जून 2023 या कालावधीत होणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट करत म्हटले आहे की, परीक्षेच्या तारखा आणि इतर माहितीसाठी उमेदवारांनी http://nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. (UGC NET JUN 2023) उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2023 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या सत्रासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांना 1100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, SC/ST/PWD उमेदवारांना 275 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. दरम्यान, नेट परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्च 2022 या कालावधीत होणार आहे. UGC NET परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारा

MB NEWS:राज ठाकरे 3 जानेवारीला परळीत:परळी कोर्टात राहणार हजर

इमेज
  राज ठाकरे 3 जानेवारीला परळीत: परळी कोर्टात राहणार हजर  परळी वैजनाथ......  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 3 जानेवारी रोजी परळी दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त येथे शुक्रवारी मराठवाडय़ातील मनसे प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.  मनसेचे परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी सांगितले की, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा नववर्षात परळी दौरा होणार आहे. त्यांचे दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, गोपीनाथ गड  येथे हेलीकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर मोटारीने ते परळी कोर्टात उपस्थित राहतील.  कोर्टात काय आहे प्रकरण ? 2008 मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबई येथे अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याचे पडसाद परळीत उमटले. परळी - धर्मापुरी पॉईंटवर कार्यकर्त्यांकडून दगडफेकीत बसचे नुकसान झाले होते. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यावर व चिथावणीखोर विधानाबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी परळी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यासाठी राज ठाकरे परळी कोर्टात ३ जानेवारी रोजी हजर राहणार आह

MB NEWS:दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: बोर्डाकडून परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेला पहिला पेपर

इमेज
  दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: बोर्डाकडून परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेला पहिला पेपर         पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यावर सूचना, आक्षेप मागविण्यात आले. त्यानंतर आता राज्य मंडळाने अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. राज्य मंडळातर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात दहावी तसेच बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येते. परंतु मार्च 2020 मध्ये कोरोना आल्यानंतर पुढील दोन वर्षे संभाव्य वेळापत्रकच जाहीर करण्यात आले नव्हते. परंतु, यंदा मात्र 19 सप्टेंबरला संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानंतर संबंधित वेळापत्रकावर 15 दिवसांमध्ये लेखी सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सूचनांचा विचार करून अंतीम

MB NEWS:गाढे पिंपळगावच्या उपसरपंचपदी पांडुरंग गंगणे यांची निवड

इमेज
  गाढे पिंपळगावच्या उपसरपंचपदी पांडुरंग गंगणे यांची निवड परळी वैजनाथ ता.३०             तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूका संपन्न झाल्यानंतर गुरुवार (ता.२९) पासून रविवार (ता.०१) पर्यंत उपसरपंच पदाच्या निवडणूका घोषित करण्यात आल्या. गुरुवारी ३७ ग्रामपंचायतीच्या तर शुक्रवारी (ता.३०) ३७ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणूका संपन्न झाल्या. यामध्ये गाढे पिंपळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पांडुरंग गंगणे यांची बहुमताने निवड करण्यात आली.            तालुक्यातील गाढे पिंपळगाव ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक संपन्न झाली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे सरपंचपदी अमोल घुंबरे व या गटाचे ११ पैकी ७ सदस्य निवडून आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे ५ सदस्य निवडून आले. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत याच गटाचा उपसरपंच निवडून येणार हे पक्के होते.  शुक्रवारी (ता.३०) उपसरपंचपदाची निवड करण्यात आली. या विशेष बैठकीत सरपंच अमोल घुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. भाजपच्या वतीने वर्षा चंद्रकांत सोनवणे यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पांडुरंग गंगणे यां

MB NEWS:पौळ पिंपरीच्या सरपंच पदाचा माणिकराव पौळ यांनी स्विकारला पदभार गणेश आबा पौळ यांची एकमताने उपसरपंच पदी निवड

इमेज
  पौळ पिंपरीच्या सरपंच पदाचा माणिकराव पौळ यांनी स्विकारला पदभार गणेश आबा पौळ यांची एकमताने उपसरपंच पदी निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पौळ पिंपरी ग्रामपंचायत निवडणूक २०२२ मध्ये सरपंच पदासाठी माणिकराव पौळ हे बहुमताने विजयी  झाले होते, त्यांनी निवडून आल्यानंतर शुक्रवार दि.३० रोजी आपल्या पदाचा पदभार घेतला. याचवेळी झालेल्या उपसरपंच निवडीच्या बैठकीत एकमताने गणेश आबा पौळ यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली. राज्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून पौळ पिंपरी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. २०२२ च्या झालेल्या निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवत प्रचंड बहुमताने ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून दिले. जनतेतून झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत माणिकराव पौळ हे बहुमताने विजयी झाले तर पॅनलचे एकूण ११ पैकी सात उमेदवार विजयी झाले. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सरपंच माणिकराव पौळ यांनी पदभार