MB NEWS:परळी वैजनाथ येथे श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ

 परळी वैजनाथ येथे श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ



हरीपाठ, भजन, कीर्तनाचेही आयोजन


*परळी वैजनाथ (प्रतिनिधी) *

परळी शहरातील कोष्टी समाज बांधवांच्या वतीने श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.30 डिसेंबर पासून या कार्यक्रमास भव्य प्रारंभ झाला असून या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठी उपस्थिती लाभत आहे.

परळीतील गुरूकृपानगर येथील हरेगावकर यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सकाळी 7 ते 10 या वेळेत श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराणाचे पारायण करण्यात येत असून पारायणप्रमुख सौ.लताताई येळाये यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे. तर सायंकाळी 5 ते 7 या वेळेत  हरीपाठ, भजन, कीर्तन आदी धार्मीक कार्यक्रम संपन्न होत आहे. 

शुक्रवारपासून सुरू झालेल्या या सर्व धार्मिक कार्यक्रमास भाविक-भक्तांची मोठी गर्दी होत आहे. सकाळच्या व संध्याकाळच्या सत्रातील व चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण व हरीपाठ, भजन, कीर्तन श्रवणासाठी शहरातील महिला-पुरूष मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी कोष्टी समाजातील महिला, पुरूष परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार