MB NEWS:"जोशींची तासिका" होणार सन्मानित ;अनिरुद्ध जोशींना "वार्ता भूषण" पुरस्कार जाहीर

 "जोशींची तासिका" होणार सन्मानित ;अनिरुद्ध जोशींना "वार्ता भूषण" पुरस्कार जाहीर




परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...
       येथील सर्वपरिचित मुक्त पत्रकार व स्तंभलेखक अनिरुद्ध जोशी यांना श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे मराठी साहित्य संमेलन अंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रातील वार्ता भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या निमित्ताने सर्वदूर प्रसिद्ध झालेल्या "जोशींची तासिका" या स्तंभाचा एक प्रकारे सन्मान होणार आहे.

       श्रीनाथ मानव सेवा मंडळ  यांच्या वतीने सहावे मराठी साहित्य संमेलन दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथ्रा येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे या राहणार आहेत. तर युवा साहित्यिक, कवी दंगलकार डॉ. स्वप्नील चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील मान्यवर मसाप मराठवाड्याचे अध्यक्ष दगडू लोमटे, ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती विशेष व्यक्तिमत्त्वांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

       या पुरस्कारात परळीतील युवा पत्रकार व "जोशींची तासिका" फेम मुक्त पत्रकार अनिरुद्ध जोशी यांची निवड वार्ता भूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. नुकतीच याबाबतची घोषणा श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे यांनी केली आहे. या निमित्ताने जनमानसात लोकप्रिय ठरलेल्या जोशींची तासिका या स्तंभाचा सन्मान होणार आहे. या पुरस्काराबद्दल मुक्त पत्रकार अनिरुद्ध जोशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार