इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून सूर्यकांत विश्वासराव हेच शिक्षक आमदारकीचे खरे दावेदार-अनुप कुसुमकर

 शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून सूर्यकांत विश्वासराव हेच शिक्षक आमदारकीचे खरे दावेदार-अनुप कुसुमकर




परळी,( प्रतिनिधी):-


मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणुक नुकतीच जाहिर झाली असुन शिक्षकांच्या प्रश्वावर सातत्याने लढा देणारे मराठवाडा शिक्षक संघटनेचे अधिकृत उमेदवार सूर्यकांत विश्वासराव विजय निश्चित होणार असून सभागृहात असलेल्या प्रतिनिधी हा राजकिय पक्षाचा बांधील नसता तो केवळ शिक्षकांचा प्रतिनिधी असावा अशी प्रतिक्रिया मराठवाडा शिक्षण संघटना परळी तालुका अध्यक्ष अनुप कुसुमकर यांनी दिली.


मागील अनेक वर्षापासून सातत्याने शिक्षकांच्या अनुदानाचे प्रश्न असतील वैयक्तिक मान्यतेचे प्रश्न,संस्थेचालककडून होणाऱ्या अन्याय बाबत शासन दरबारी वाचा फोडणे,जुनी पेन्शन योजना, प्रचलित नियमानुसार अनुदानाचा प्रश्न, तसेच एक नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेल्या विना अनुदानित,अंशतः अनुदानित सर्व शिक्षकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न अशा असंख्य प्रश्नासाठी खऱ्या अर्थाने रस्त्यावरची लढाई लढणारा एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे सूर्यकांत विश्वासराव हेच आहेत.जुन्या पेन्शन प्रश्नी सध्याच्या नागपूर अधिवेशन काळात लाखो शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना घेऊन शासनास दखल घेण्याजोगे आंदोलन त्यांच्या नेतृत्वात संपन्न झाले . या धडाकेबाज कार्यामुळे व शिक्षक बांधवांनी हाक दिल्यानंतर तात्काळ उपलब्ध होणारे शिक्षकांसाठी पूर्ण वेळ कार्य करणारे  असल्यामुळे ते आज मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार आहेत.शिक्षकांच्या प्रश्वांची जाण आणी त्यांचे प्रश्न सोडवुन घेण्याची क्षमता त्यांची आहे.अहोराञ कष्ट घेतल्यानेच त्यांचा शिक्षक मतदार संघातील आमदार होण्याचा मार्ग निश्चित कोणीच रोखू शकत नाही असे मराठवाडा शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अनुप कुसुमकर संघाचे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!