इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:सामाजिक बांधिलकी: डॉ.दि. ज. दंडे प्रतिष्ठानच्या वतीने शाळेला संगणक भेट

सामाजिक बांधिलकी: डॉ.दि. ज. दंडे प्रतिष्ठानच्या वतीने शाळेला संगणक भेट


परळी वैजनाथ   30   (प्रतिनिधी)

येथील डाॅ. दि जं दंडे  प्रतिष्ठानच्या वतीने  लावण्याई पब्लिक स्कूल  च्या  मुलांसाठी  संगणक  भेट देण्यात  आले. या वेळी मुंबई  हायकोर्ट  येथील ॲड. तेजस दंडे व डाॅ. विवेक दंडे  यांनी भविष्यात आम्ही  या शाळेसाठी सदैव  मदत करणार  असल्याचे  आवर्जून सांगितले.

या कार्यक्रमाला  प्रमुख पाहणे  म्हणुन अतुल नरवाडकर,  डाॅ विवेक दंडे ,मुंबई  हायकोर्ट चे वकील  ॲड.तेजस  दंडे, शाळेचेअध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनंत कुलकर्णी,  मुख्याध्यापक  अस्मिता गोरे  आदिंची उपस्थिती  होती . या कार्यक्रमाचे सुञसंचलन शाळेच्या उपमुख्याध्यपिका  पुजा बिडवे  यांनी केले ,तर आभारप्रदर्शन  कविता विर्धे  मॅडम  यांनी केले.  हा कार्यक्रम  यशस्वी  करण्यासाठी  हर्षदा  परदेशी,  संघमिञा पोटभरे,  शेख सर, अनुपमा डोडिया यांनी परिश्रम  घेतले. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!