MB NEWS:ए.तु. कराड यांचा एक जानेवारी रोजी सेवानिवृत्ती गौरव सोहळा

 ए.तु. कराड यांचा एक जानेवारी रोजी सेवानिवृत्ती गौरव सोहळा



परळी (प्रतिनिधी. )  नागपूर केंद्राचे केंद्रप्रमुख तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाबीचे मुख्याध्यापक ए.तु.कराड हे 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने दिनांक एक जानेवारी 2023  रोजी सेवानिवृत्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कराड सर आदर्श मुख्याध्यापक तसेच साहित्यिक तसेच सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत.

       शहरातील सोमेश्वर नगर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी बारा वाजता या गौरव सोहळ्यास सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण कराड उपसचिव, मंत्रालय, मुंबई हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी सौ नम्रता चाटे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती शिवाजी मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत.

    सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यास शिक्षक, प्राध्यापक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तसेच सर्व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाबी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार