MB NEWS:महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित मुंबईच्या(महानंद) संचालक पदी फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड

 महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित मुंबईच्या(महानंद) संचालक पदी फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड



निवडीबद्दल  सर्व स्तरातून अभिनंदन


परळी, (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई म्हणजेच महानंद दूध डेरी च्या संचालक पदी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी इतर उमेदवारांनीआपले उमेदवारी अर्ज परत घेतल्यामुळे  फुलचंद कराड यांची सर्वसाधारण मतदार संघातून बिनविरोध निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


      परळी तालुका दूध उत्पादक व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित परळीचे चेअरमन तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांची महाराष्ट्र राज्य दूध महासंघ (महानंद) दूधडेरी च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.  ही निवड पुढील पाच वर्षापर्यंत राहणार आहे


ग्रामपंचायत निवडणुकीमुळे महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मुंबईचे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. आज हा कार्यक्रम पूर्णपणे पार पडला असून फुलचंद कराड सर्वसाधारण गटातून बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडीबद्दल फुलचंद कराड यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. दरम्यान राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. सोबतच शेतकऱ्यांच्या दुधाला राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यावरी ही आपला भर असल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !