युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:पौळ पिंपरीच्या सरपंच पदाचा माणिकराव पौळ यांनी स्विकारला पदभार गणेश आबा पौळ यांची एकमताने उपसरपंच पदी निवड

 पौळ पिंपरीच्या सरपंच पदाचा माणिकराव पौळ यांनी स्विकारला पदभार


गणेश आबा पौळ यांची एकमताने उपसरपंच पदी निवड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

पौळ पिंपरी ग्रामपंचायत निवडणूक २०२२ मध्ये सरपंच पदासाठी माणिकराव पौळ हे बहुमताने विजयी  झाले होते, त्यांनी निवडून आल्यानंतर शुक्रवार दि.३० रोजी आपल्या पदाचा पदभार घेतला. याचवेळी झालेल्या उपसरपंच निवडीच्या बैठकीत एकमताने गणेश आबा पौळ यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.


राज्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून पौळ पिंपरी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. २०२२ च्या झालेल्या निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवत प्रचंड बहुमताने ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून दिले. जनतेतून झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत माणिकराव पौळ हे बहुमताने विजयी झाले तर पॅनलचे एकूण ११ पैकी सात उमेदवार विजयी झाले.


शुक्रवारी झालेल्या बैठकीत सरपंच माणिकराव पौळ यांनी पदभार घेतला. तर शांत, संयमी आणि सात्विक व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित असलेले गणेश आबा पौळ यांची उपसरपंच पदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, ज्येष्ठ नेते बबन अप्पा पौळ, पांडुरंग काळे, वसंत राठोड यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या