युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध- गोविंद सोनवणे

 सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ.युमना शिवाजी सोनवणे यांनी स्वीकारला पदभार



 उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची  बिनविरोध निवड



सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध- गोविंद सोनवणे



अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व निर्माण केले आहे. सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ. युमना शिवाजी सोनवणे यांनी पदभार स्वीकारला तसेच  उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ. युमना शिवाजी सोनवणे व पॅनल प्रमुख गोविंद सोनवणे यांनी सांगितले. 

        ग्रामपंचायत निवडणूक 2022 संपन्न झाली आणि उपसरपंच यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यानुसार सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ. युमना शिवाजी सोनवणे यांनी पदभार स्वीकारला तर उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची एक मताने निवड करण्यात आली. सोमनवाडी ग्रामपंचायतही पंकजाताईंच्या ताब्यात आली आहे. सोमनवाडी ग्रामपंचायत कार्यालयात पदभार ग्रहण आणि उपसरपंच निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुक्ता नारायण किडमिडे, इदुबाई वैजनाथ मुंडे, छायाबाई दत्तत्रय सोनवणे, मच्छिन्द्र माधव चाटे, वार्ड सुशीला बाबू ओटले, बाबुराव नाथराव सोनवणे सर्व सदस्य उपस्थितीत होते. 

           भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोविंद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सोमनवाडी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सोमनवाडी जनसेवा विकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ. युमना शिवाजी सोनवणे यांच्यासह सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत. 

            परळी मतदार संघातील अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी ग्रामपंचायत या गावाला सर्वात सुंदर करून तालुक्यात विकासाचे मॉडेल म्हणून हे गाव पुढे आणण्याचा प्रयत्न असणार आहे. विकासाच्या अनेक संकल्पना व योजनां या ठिकाणी राबविण्याचे धोरण निश्चित केले असून तमाम मतदार बांधवांच्या सहकार्याने या ठिकाणी विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपला पुढाकार असणार आहे.  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली

गावच्या विकासासाठी मी वचनबद्ध असुन गावामध्ये सामाजिक सलोखा राखणार आहे. सर्व समाजाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. गावातील प्रत्येक नागरीकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी बांधिल असल्याचा शब्द नवनिर्वाचित सरपंच सौ. युमना शिवाजी सोनवणे, उपसरपंच राजेंद्र नारायण भोसले व पॅनलचे गोविंद सोनवणे यांनी यावेळी दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या