इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:गाढे पिंपळगावच्या उपसरपंचपदी पांडुरंग गंगणे यांची निवड

 गाढे पिंपळगावच्या उपसरपंचपदी पांडुरंग गंगणे यांची निवड





परळी वैजनाथ ता.३०

            तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूका संपन्न झाल्यानंतर गुरुवार (ता.२९) पासून रविवार (ता.०१) पर्यंत उपसरपंच पदाच्या निवडणूका घोषित करण्यात आल्या. गुरुवारी ३७ ग्रामपंचायतीच्या तर शुक्रवारी (ता.३०) ३७ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणूका संपन्न झाल्या. यामध्ये गाढे पिंपळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पांडुरंग गंगणे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

           तालुक्यातील गाढे पिंपळगाव ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक संपन्न झाली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे सरपंचपदी अमोल घुंबरे व या गटाचे ११ पैकी ७ सदस्य निवडून आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे ५ सदस्य निवडून आले. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत याच गटाचा उपसरपंच निवडून येणार हे पक्के होते.  शुक्रवारी (ता.३०) उपसरपंचपदाची निवड करण्यात आली. या विशेष बैठकीत सरपंच अमोल घुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. भाजपच्या वतीने वर्षा चंद्रकांत सोनवणे यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पांडुरंग गंगणे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी वर्षा सोनवणे उपसरपंचपदी निवड होणे अपेक्षित असताना मतदानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते शरद राडकर यांनी जादूची कांडी फिरवत पांडुरंग गंगणे यांना ७ मते तर वर्षा सोनवणे यांना ५ मते पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग गंगणे यांची बहुमताने उपसरपंचपदी निवड करण्यात आली. पांडुरंग गंगणे यांची निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.दरम्यान माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक आण्णा कराड, अजय मुंडे यांनी पँनल प्रमुख शरद राडकर व उपसरपंच पांडुरंग गंगणे यांचे  अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या