नंदनज ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा शिवकन्या योगीराज गुट्टे यांनी स्विकारला पदभार सौ सुनंदा शिवाजी गुट्टे यांची उपसरपंच पदी निवड

 नंदनज ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा शिवकन्या योगीराज गुट्टे यांनी स्विकारला पदभार



सौ सुनंदा शिवाजी गुट्टे यांची उपसरपंच पदी निवड




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नंदनज ग्रामपंचायत निवडणूक २०२२ मध्ये सरपंच पदासाठी शिवकन्या योगीराज गुट्टे हया बहुमताने विजयी झाल्या होते, त्यांनी निवडून आल्यानंतर शुक्रवार दि.३० रोजी आपल्या पदाचा पदभार घेतला. याचवेळी झालेल्या उपसरपंच निवडीच्या बैठकीत एकमताने सौ सुनंदा शिवाजी गुट्टे  यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली. 

     भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील नंदनज ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार शिवकन्या योगीराज गुट्टे यांच्यासह पाच उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत. श्री संत केदारेश्वर जनसेवा विकास पॅनलचे कै.योगीराज गुट्टे यांच्या पत्नी सरपंच शिवकन्या योगीराज गुट्टे यांच्यासह सदस्य म्हणुन सुनंदा शिवाजी गुट्टे, सतीश बाबुराव गायकवाड, नाथराव हरिभाऊ गुट्टे, देवशाला सोमनाथ गुट्टे, अरविंद बापूराव गुट्टे हे सर्व बहुमताने विजय झाले आहेत. शुक्रवारी दि.30 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत सरपंच शिवकन्या योगीराज गुट्टे यांनी पदभार घेतला.  तसेच उपसरपंचपदी सर्वानुमते सौ सुनंदा शिवाजी गुट्टे यांची निवड करण्यात आली. नंदनज ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच पदभार स्वीकार व उपसरपंच निवड प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.  नंदंनज गावातील गोरगरीब व सुज्ञ मतदार बंधू वडीलधारी मंडळी महिला माझ्या आई बहिणी सर्वांनी एवढ्या बहुमताने माझ्या पॅनलला ऐतिहासिक विजयाने निवडून दिलात आपण विजयाचे शिल्पकार झाला माझ्या वडिलांपासून मी राजकारण करत आलो आहे एवढ्या मोठ्या मताचा फरक कधीच पडला  नव्हता सरपंच पदासहित 5 जागा आपण निवडून दिलात इथून पुढे मी गावात सर्व सदस्यांच्या वतीने विकास केल्याशिवाय राहणार नाही नंदनज गाव हे तंटामुक्त केल्याशिवाय राहणार नाही आपले आशीर्वाद माझ्या सर्व सदस्यांच्या पाठीमागे व सरपंचाच्या आणि उपसरपंचाच्या पाठीमागे राहावेत नक्कीच मी तुमच्या विश्वासाला पात्र राहील अशी प्रतिक्रिया सुनील गुट्टे यांनी दिली आहे.  निवडीनंतर सरपंच ,उपसरपंच व सदस्यांचा शाल पुष्पगुच्छ हार तसेच पेढा भरवून सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !