MB NEWS:डॉ दिगंबर दंडे यांच्या प्रथम स्मरणदिनामित्त 8 जानेवारी रोजी 'श्रीकृष्णार्पणमस्तु ' गौरव ग्रंथाचे परळीमध्ये प्रकाशन

 डॉ दिगंबर दंडे यांच्या प्रथम स्मरणदिनामित्त 8 जानेवारी रोजी 'श्रीकृष्णार्पणमस्तु ' गौरव ग्रंथाचे परळीमध्ये प्रकाशन 




.............................

परळी दिनांक 30 डिसेंबर प्रतिनिधी

परळी वैजनाथ येथील सामाजिक व शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीचे आधारस्तंभ प्रख्यात डॉ. दिगंबर जनार्दन दंडे उर्फ आबा यांच्या प्रथम स्मरणदिनानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित व  डॉ.दि .ज. दंडे प्रतिष्ठान आयोजित ' श्रीकृष्णार्पणमस्तु ' या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळा 8 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे.

             या गौरव ग्रंथाचे प्रकाशन सामाजिक क्षेत्रातील भूषणावह व्यक्तिमत्व, पद्मभूषण अशोकजी कुकडे व  ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ वृषाली किन्हाळकर,  यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री डॉ माधवराव किन्हाळकर व अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता  डॉ.सुधीर देशमुख  उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ हरिष्चंद्र वंगे, श्री दीनदयाळ नागरी सहकारी बँक लि. चे अध्यक्ष ॲड. मकरंद पत्की, परळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष 

डॉ ज्ञानेश्वर घुगे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष  डॉ.अजित केंद्रे, परळी शहराचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तसेच दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष ॲड राजेश्वर देशमुख, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व गौरव ग्रंथाचे संपादक सदानंद  महाजन  तसेच गौरव ग्रंथाच्या संपादिका व ज्येष्ठ लेखिका संगीता पुराणिक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !