MB NEWS:राज ठाकरे 3 जानेवारीला परळीत:परळी कोर्टात राहणार हजर

 राज ठाकरे 3 जानेवारीला परळीत:परळी कोर्टात राहणार हजर 



परळी वैजनाथ...... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 3 जानेवारी रोजी परळी दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त येथे शुक्रवारी मराठवाडय़ातील मनसे प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. 

मनसेचे परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी सांगितले की, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा नववर्षात परळी दौरा होणार आहे. त्यांचे दि. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, गोपीनाथ गड  येथे हेलीकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर मोटारीने ते परळी कोर्टात उपस्थित राहतील. 

कोर्टात काय आहे प्रकरण ?

2008 मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबई येथे अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याचे पडसाद परळीत उमटले. परळी - धर्मापुरी पॉईंटवर कार्यकर्त्यांकडून दगडफेकीत बसचे नुकसान झाले होते. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यावर व चिथावणीखोर विधानाबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी परळी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यासाठी राज ठाकरे परळी कोर्टात ३ जानेवारी रोजी हजर राहणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार