युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:कोष्टी समाज मंडळाच्या वतीने अंबाजोगाई येथे श्री चौंडेश्वरी महोत्सवास उत्साहात सुरुवात

 कोष्टी समाज मंडळाच्या वतीने अंबाजोगाई येथे श्री चौंडेश्वरी महोत्सवास उत्साहात सुरुवात




अंबाजोगाई/ प्रतिनिधी

कोष्टी समाज मंडळाच्या वतीने अंबाजोगाई येथे श्री चौंडेश्वरी महोत्सवास आज शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई कोष्टी समाज मंडळाच्या वतीने श्री चौंडेश्वरी देवी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी मंदिर कोष्टी गल्ली अंबाजोगाई येथे दिनांक 30 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आठ दिवस श्री चौंडेश्वरी देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देवांग पुराण पारायण, भजन, कीर्तन, हरिपाठ ,जागरण गोंधळ आदि कार्यक्रम होणार आहे. आज शुक्रवारी सकाळी  श्री चौंडेश्वरी देवीची विधीवत पूजा  करण्यात आली. दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी श्री चौंडेश्वरी देवी महोत्सवाची सांगता पारायण समाप्तीनंतर होणार असून यानिमित्त देवांग पुराण ग्रंथ मिरवणूक अंबाजोगाई शहराच्या विविध मार्गावरून निघणार आहे. दररोज दुपारी चार ते सायंकाळी सात वाजता महिलांचे हरिपाठ व भजन होईल. दिनांक 6 जानेवारी रोजी कोष्टी समाजाचे अध्यक्ष नारायणराव हरेगावकर यांच्या हस्ते पहाटे चार वाजता श्री चौंडेश्वरी देवीची महापूजा सकाळी सात वाजता पूर्णहूती व सकाळी दहा वाजता ह भ प श्री अच्युतराव जोशी महाराज केंद्रेवाडीकर यांचे काल्याचे किर्तन व कीर्तनास श्री ह भ प अमोल घोडके महाराज सावतामाळी भजनी मंडळ यांची साथ होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल.

या सर्व कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी उत्सव व गोष्टी समाज मंडळ अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या