पोस्ट्स

पूर्वी भारताचा आवाज ऐकू येत नव्हता, आता संपूर्ण जगात भारताचा डंका - पंकजाताई मुंडे

इमेज
पंकजाताई मुंडे यांचा मध्यप्रदेशात झंजावती दौरा ; मोदी @9 अभियानाला मोठा प्रतिसाद भारताने नऊ वर्षात गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या पूर्वी भारताचा आवाज ऐकू येत नव्हता, आता संपूर्ण जगात भारताचा डंका - पंकजाताई मुंडे _संघटनात्मक मुद्द्यांवर दिला भर_ जबलपूर (म.प्र.) ।दिनांक १३। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी गेल्या चार दिवसांत संघटनात्मक दृष्टया मध्यप्रदेशचा यशस्वी झंझावाती दौरा केला. मोदी @9 अभियानांतर्गत त्यांचे विविध जिल्हयात मोठया उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणात कार्यक्रम पार पडले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात भारताने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या आहेत.  पूर्वी भारताचा आवाज ऐकू येत नव्हता, आता भारताचा डंका जगात वाजत असल्याचे त्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रमात बोलतांना सांगितले.   गेल्या नऊ वर्षांत गरीब आणि वंचितांची सेवा करणारा, महिला शक्तीला बळ देणारा, तरुणांची स्वप्ने पूर्ण करणारा आणि शेतकऱ्यांचे कल्याण करणारा भारत निर्माण झाला आहे.  कलम ३७० रद्द करण्यात आले, तिहेरी तलाकची वाईट प्रथा संपली आणि दहशतवाद संपुष्टात आला. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी

VIDEOS: व्हिडीओ:संत गजानन महाराज दिंडी परळीत

इमेज
VIDEOS: व्हिडीओ:संत गजानन महाराज दिंडी परळीत श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज व चांदूरबाजार येथील श्री संत गुलाब महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी सकाळी 7 वाजता मोंढा मार्केट येथील संकटमोचन हनुमान मंदिर येथे आगमन झाले. यावेळी परळीकरांच्या वतीने पालखी दिंडीचे जल्लोषात, उत्साहात स्वागत केले. टाळ मृदुंगाच्या तालावर दिंडीतील हजारो वारकर्‍यांनी ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’च्या गजरात ठेका धरला. ‘पंढरीनाथ महाराज की जय‘, ‘विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल’ ‘संत गजानन महाराज की जय’, ‘गण गण गणात बोते’ या जयघोषाने एकापाठोपाठ एक सुंदर अशा चालीवर भजन करीत या वारकर्‍यांनी परळी शहर अक्षरशः दणाणून सोडला. परळी विविध व्यापारी महासंघाच्या वतीने वारकर्‍यांचे, श्रींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोंढा मार्केट येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात भाविकांकरीता अल्पोपहारासह फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकर्‍यासह अन्य भाविकांनीही या फराळाचा आस्वाद घेतला. तेथून दिंडीने राणी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे श्री संत जगमित्र नागा मंदिरकडे प्रस्थान केले. शेकडो व्यापार्‍य
इमेज
  परळीकरांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज व  गुलाब महाराज यांच्या दिंडीचे उत्साहात स्वागत परळी वैजनाथ/ संतोष जुजगर  श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज व चांदूरबाजार येथील श्री संत गुलाब महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी सकाळी 7 वाजता मोंढा मार्केट येथील संकटमोचन हनुमान मंदिर येथे आगमन झाले. यावेळी परळीकरांच्या वतीने पालखी दिंडीचे  जल्लोषात, उत्साहात स्वागत केले. टाळ मृदुंगाच्या तालावर दिंडीतील हजारो वारकर्‍यांनी ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’च्या गजरात ठेका धरला. ‘पंढरीनाथ महाराज की जय‘, ‘विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल’ ‘संत गजानन महाराज की जय’, ‘गण गण गणात बोते’ या जयघोषाने एकापाठोपाठ एक सुंदर अशा चालीवर  भजन करीत या वारकर्‍यांनी परळी शहर अक्षरशः दणाणून सोडला. परळी विविध व्यापारी महासंघाच्या वतीने वारकर्‍यांचे, श्रींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत  दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोंढा मार्केट येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात भाविकांकरीता अल्पोपहारासह फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकर्‍यासह अन्य भाविकांनीही या फराळाचा आस्वाद घेतला. तेथून दिंडीने राणी लक्ष्
इमेज
निवृत्त शिक्षणाधिकारी राघवेंद्र उर्फ आर आर कुलकर्णी यांचे निधन  बीड- येथील निवृत्त शिक्षणाधिकारी राघवेंद्र उर्फ आर आर कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते.                                   एक प्रामाणिक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते सुपरिचित होते.त्यांनी आपल्या शिक्षणाधिकारी पदाच्या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते.अधिकारी आणि कर्मचारी वर्गात आदराचे स्थान असलेले आर आर कुलकर्णी गेल्या काही दिवसापासून बीडच्या लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.         त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा श्याम,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. बीड येथील विशेष लेखा परीक्षक वर्ग 2 श्याम पिंपरकर कुलकर्णी यांचे ते वडील होते.       त्यांच्या पार्थिव देहावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता बीडच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अग्निशमन वेळीच पोहोचल्याने आग आटोक्यात

इमेज
  कॉटन इंडस्ट्रीजला आग; वीस लाखांचे नुकसान अग्निशमन वेळीच पोहोचल्याने आग आटोक्यात गेवराई...  गेवराई शहराजवळ असलेल्या महाबली कॉटन इंडस्ट्रीजला आज दि. 12 जून सोमवार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रेसिंग मध्ये काम चालू असताना अति उष्णतेमुळे व स्पार्किंग मुळे आगीची ठिणगी पडून आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या आगीमध्ये प्रेसिंग मध्ये चालू असलेला कापूस, रुई व गठान जळून वीस लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वेळीच कृषी उत्पन्न बाजार समितीची अग्निशमन गाडी पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाबली कॉटन इंडस्ट्रीज गेल्या तेरा वर्षापासून कार्यरत असून कापूस व्यापारामध्ये महाबली कॉटन इंडस्ट्रीजचे मोठे नाव आहे. गेवराई तालुक्यातील कापूस व्यापारामध्ये महाबली इंडस्ट्रीज चा मोठा हातभार आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मदत करण्यात येते. गेल्या तेरा वर्षांमध्ये एकदाही आग लागण्याचा असा अनुचित प्रकार घडलेला नाही. परंतु दिनांक 12 जून रोजी अति उष्णतेमुळे व स्पार्किंग मुळे आगीची ठिणगी पडू

मुख्यमंञ्यांनी जाहिर केलेले जनहिताच्या योजना घराघरात पोहचविणार - सचिन स्वामी

इमेज
  रस्त्यावरील झालेल्या अपघातात जखमी झालेल्याना मोफत उपचारा संबंधितीचा जीआर त्वरित लागु करा- शिवसेनेने दिले निवेदन मुख्यमंञ्यांनी जाहिर केलेले जनहिताच्या योजना घराघरात पोहचविणार - सचिन स्वामी परळी वैद्यनाथ    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने रस्तावरील अपघातात जखमींना त्वरित ७२ तास मोफत उपचार हा सर्वसामान्य नागरिकांना दिलासादायक विधायक नविन जीआर काढला असून यामुळे राज्यातील जनतेला अतिशय मोठा दिलासा मिळाला आहे. या जीआरचे सर्वच क्षेत्रात स्वागत केले जात आहे.या जनउपयोगी नविन जीआरची त्वरित अमलबजावणी  करण्यासाठी परळी उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना शिवसेनेच्या वतिने सोमवार दि.12 जुन रोजी निवेदन देण्यात आले आहे. या योजनेचा  रस्त्यावरील झालेल्या अपघातात जख्मी झालेल्याना मोफत उपचारा संबंधितीचा जीआर परळी उपजिल्हा क्षेत्रातील सर्वच रुग्णालयाना आदेश काढावा असे निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे खा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकार विविध लोकाभिमुख योजना लागू करत असून त्
इमेज
  संविधान समता दिंडी:एक दिवस तरी वारी अनुभवावी जय हरी  संतांनी सांगितलेला समतेचा विचार आणि भारतीय संविधानातील मूल्ये एकमेकांना पूरक आणि सुसंगत आहेत. त्यामुळेच आम्ही हा विचार मनात ठेवून गेली १० वर्षे ''एक दिवस तरी, वारी अनुभवावी'' या उक्तीनुसार वारी सहभागी असतो. तसेच, गेली गेली ५ वर्षांपासून आम्ही ''संविधान समता दिंडी'' च्या माध्यमातून पंढरपूरपर्यन्त दिंडी नेत आहोत. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सोयराबाई, संत जनाबाई आदी सर्व संत मांदियाळीने सांगितलेला समतेचा विचार आम्ही लोकांपर्यंत घेवून जात आहात. याच विचाराला जोडून आम्ही समतेचा झेंडा खांद्यावर घेवून  पंढरपूरला निघालो आहोत. मंगळवार, दि. १३ जून २०२३ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळात पंढरपूरला जाणाऱ्या समता दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या गंजपेठेतील वाड्यावर आपण यावे, यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण ! संताचा समतेचा विचार आपणही आपल्या वारकरी भावा-बहिणीसोबत  पंढरपूरपर्यंत नेत आहात. तुमच्या दिंडीचा सत्कार देखील आम्ही करू इच्छित आहोत. आपण उपस्थ
इमेज
  नगर परिषदेची कर वसुलीची विशेष मोहीम नागरिकांनी विविध करांचा भरणा करून संभाव्य कारवाई टाळावी - मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-         परळी नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडे थकीत असलेल्या विविध करांचा भरणा करून संभाव्य कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे.         परळी नगर परिषदेने सन 2023 -24 या आर्थिक वर्षाचे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्या उद्दीष्ट्यपुर्तीसाठी नगर परिषदेने शहरामध्ये विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. नागरिकांनी त्यांच्याकडे घरपट्टी, मालमत्ता कर, जमीन कर, इमारत किराया, मोबाईल टाॅवर भाडे, दुकान भाडे, नळपट्टी आदी करांचा तातडीने भरणा करावा. विविध करांचा वेळेवर भरणा केला नाही तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मुख्याधिकारी कांबळे यांनी दिला आहे.       करांच्या वसुलीसाठी नगर परिषदेने विविध पथके तयार करण्यात आली आहेत. पथकातील कर्मचारी नागरीकांकडे जाऊन
इमेज
 खा.शरद पवार  व खा.संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; महाविकास आघाडीचा बीडमध्ये  मूक मोर्चाचे आयोजन  आ.धनंजय मुंडे, प्रकाश दादा सोळंके, सतिश चव्हाण, विक्रम काळे, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, माजी आ.अमरसिंह पंडित आदींची उपस्थिती या भव्य मूक मोर्चास उपस्थित रहा - ऍड.राजेश्वर चव्हाण, बाळा बांगर बीड दि.११ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार व शिवसेना (उबाठा) चे खा.संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी काही समाज कंटकांकडून देण्यात आली आहे. राज्यभरातून अश्या माथेफिरूविरोधात संतापाची लाट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज (दि.१२) बीडमध्ये महाविकास आघाडी आणि   समविचारी पक्ष, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार असून यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांनी केले.            राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अ
इमेज
  शिक्षणाधिकारी कार्यालयावर शालेय पोषण कामगार विराट मोर्चाचे आयोजन  परळी / प्रतिनिधी बीड जिल्हयातील शालेय पोषण कामगारांचा विविध प्रलंबीत न्याय मागण्या मंजुर करून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.बीड यांच्या कार्यालयावर विराट मोर्च्याचे आयोजन केले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नागरगोजे, सरचिटणीस डॉ. अशोक थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकात नमुद करून कामगारांना मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले आहे. सन २००२ पासून राज्यात शालेय पोषण आहार योजना सुरू आहे. जि.प.शाळा व खाजगी संस्थेतील शाळेत पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या मुला-मुलीसाठी या योजने मार्फत दुपारचे भोजन दिले जाते. मध्यान्ह भोजन बनवणाऱ्या स्वयंपाकी, मदतनिस यांना दरमहा १५००/- रूपये मानधन म्हणजे दररोज ५० रुपये दिले जाते. २० वर्षापासून शाळेत काम करत असलेल्या शालेय पोषण कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहेत. म्हणुन या मोर्चाचे आयोजन अध्यक्ष प्रभाकर नागरगोजे, सरचिटणीस डॉ. अशोक थोरात यांच्या नेतृत्वात केले आहे. संघटनेच्या संघर्षातुन काही मागण्या मान्य झाल्या आहेत. आणि  बऱ्याच मागण्या प्रलंबीत आहेत. केरळ सरकारच्या धर्तीवर शालेय पोषण

Video- आळंदी देवाची- माऊली संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट

इमेज
  आळंदी देवाची येथून आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले.या अनुषंगाने माऊली संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली आहे.  
इमेज
  कृषिमंत्री अब्दुल सत्तार चा राजीनामा तात्काळ घ्या !  वसंत मुंडे                                   परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या कृषी खात्याच्या इतिहासात कर्मचारी अधिकारी बदल्या पदोन्नती, पिक विमा, खते बी बियाणे औषधी, कृषी विद्यापीठे व कृषी खात्यातील विविध अनुदानात  कृषी मंत्र्यांनी  रेट कार्ड(दरसुची) ठरवून ६० कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार केलाच आरोप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. नागरी सेवा मंडळाने अपात्र केल्यावरही संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण या पदावर पात्र नसताना विकास पाटील यांचे नियुक्ती करून ५ कोटी रुपये घेतले व रवींद्र भोसले नागपूर विभागीय कृषी संचालक या पदावरून पदोन्नतीने संचालक मृदा संधारण या पदासाठी २ कोटी रुपये घेऊन नियुक्ती देण्यात आली व माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी भोसले यांना पदोन्नती मध्ये वगळलेले होते. औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांची एका दिवसासाठी सेवानिवृत्तीचा कार्यकाल शिल्लक असताना व भ्रष्टाचाराच्या चौकशी चालू असतानाही संचालक पदासाठी १ कोटी रुपये घेऊन नियमबाह्य नियुक्त केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते

राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाचे लोखंडी कठडे गायब होण्याच्या वाटेवर

इमेज
  राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाचे लोखंडी कठडे गायब होण्याच्या वाटेवर  केज :- राष्ट्रीय महामार्गा वरील पूल आणि धोकादायक वळणावर लावलेले संरक्षक कठडे हे गायब होण्याच्या मार्गावर असून अनेक ठिकाणी ते अर्धवट निघून पडलेले आहेत. त्यामुळे अपघात घडण्याची व जिवीत हानी होण्याचा ढोका आहे. केज तालुक्यातून महामार्ग क्र ५४८ सी ५४८ डी हे दोन महामार्ग जात आहे. या महामार्गावरील अनेक पुलाला लावलेले लोखंडी बॅरिकेटिंग व पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे काही ठिकाणी निघून पडलेले आहेत. तर काही ठिकाणी अज्ञात ईसमानी अज्ञात कारणासाठी  अर्धवट अवस्थेत काढून ठेवलेले आहेत. सदर कठडे चोरी देखील होण्याची दाट शक्यता असून पुलाला आणि धोकेदायक वळणावरील कठडे नसल्यामुळे अपघात होऊन जिवीत हानी होऊ शकते. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि सदोष कामामुळे अपघात आणि जिवीत हानित वाढ :- या राष्ट्रीय महामार्गा वरील रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत तर पूल खचून त्याला भेगा पडून लोखंडी सळया उघड्या पडलेल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी जम्पिंग रस्ता असल्याने भरधाव वेगाने जाणारी वाहने आढळून अपघात होत आहेत. मात्र याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंड
इमेज
  लोखंडी गज  उघडे  पडल्याने अपघातांना निमंत्रण   नेकनूर,  अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीत मार्गावर नेकनुर ते मांजरसुंभा दरम्यान गवारी फाट्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून रस्ते कामासाठी वापरण्यात आलेले लोखंडी गज उघडे पडले असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असुन संबंधीत प्रकरणात जबाबदार ठेकेदार एचपीएम कंपनी व अभियंत्यावर कारवाई करण्यात येऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अशी लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी, प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे, मुख्य अभियंता म.रा.र.वि.म(मर्या) मुंबई यांना केली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा अवमान --- अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी दुरावस्थे संदर्भात डॉ.गणेश ढवळे यांनी दि.०२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिल्यानंतर त्या अनुषंगाने अपर जिल्हादंडाधिकारी संतोष राऊत यांनी प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद यांना नियमानुसार आवश्यक कार्यवाही करणेबाबत कळवले होते मात्र या घटनेला ५ महिने
इमेज
  महाराष्ट्र ग्रामीण बँकेत साडे बारा लाखधाडसी चोरी सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हिआर गायब लिंबागणेश महाराष्ट्र ग्रामीण बँकेत धाडसी चोरी ; सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत घटनास्थळी दाखल  नेकनूर,        दि.११ जुन रविवार रोजी मध्यरात्री बीड तालुक्यातील  लिंबागणेश येथील अहमदपूर-अहमदनगर  राष्ट्रीय महामार्गावरील  लिंबागणेश  महाराष्ट्र ग्रामीण बँकेत धाडसी चोरी .सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत तसेच नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि शेख मुस्तफा, उपनिरीक्षक विलास जाधव, उपनिरीक्षक अजय पानपाटील,चालक शेख लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.ह.सचिन डिडुळ,नवनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले असुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,ठसेतज्ञ, श्वानपथक टीम दाखल झाली असुन स्थळपंचनामा करण्यात आला असून तपास चालू आहे.       मध्यरात्री लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाठीमागील बाजुने लोखंडी शिडीवरून चढून गस कटरच्या सहाय्याने लोखंडी खिडकीचे गज तोंडुन आत प्रवेश केला व स्ट्रागरूम कटरने फोडुन बँक मनेजर प्रणव कापसे यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे साडे बारा लाख रोख रक्कम व काही सोने चोरीला गेले आहे.  सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हिआर गायब
इमेज
माजी मंत्री आ. प्रकाश सोळंके यांच्या शुभहस्ते झालं सिरसाळ्यात उद्घाटन   परळी तालुक्यातील सिरसाळा बाजारपेठ झपाट्याने विकसित होत आहे.  थावरे परिवारच्या 'मोरया ऑटोमोबाईल' सिरसाळा या ट्रॅक्टर स्पेर्स पार्टसच्या दलनाचे उदघाटन *माजी मंत्री आ. प्रकाशदादा सोळंके* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, मार्केटचे संचालक लक्ष्मणराव पौळ, माजी सभापती मोहनदादा सोळंके, नरहरराव निर्मळ, माजी सरपंच सतीश आचार्य, सपकाळ महाराज, सुंदरराव माने, माने बापू, वसंतराव राठोड, रुक्षराज निर्मळ, राजाभाऊ पौळ, सचिन सोळंके, प्रभाकर पौळ, महादूजिजा, शरद कदम व इत्यादी उपस्थित होते.   मोरया ऑटोमोबाईल मध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर दुरुस्ती तसेच महिंद्रा, स्वराज या कंपनीचे स्पेर्स पार्ट, विविध ऑइल & ग्रीस येथे  उपलब्ध करण्यात आले आहेत.

वसंत राठोड यांचा बंजारा समाजाच्या वतीने

इमेज
वसंत राठोड यांचा बंजारा समाजाच्या वतीने  परळी वै ता १० प्रतिनिधी     वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी वसंत राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.       परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. यात पंचायत समितीचे माजी सदस्य वसंत राठोड यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल बंजारा समाजातील मान्यवरांच्या हस्ते वसंत राठोड यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग राठोड, डि.एस.राठोड सर, मालेवाडी चे सरपंच लक्ष्मण पवार, सुशील राठोड अरुण पवार सर, प्रकाश चव्हाण, परमेश्वर गित्ते, रमेश पवार, अंकुश पवार, विकास पवार, प्रविण पवार, सोहम राठोड, मोहन राठोड यांची उपस्थिती होती.
इमेज
  पंकजाताई मुंडे चार दिवसाच्या मध्यप्रदेश दौऱ्यावर मोदी @ 9 अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांना उपस्थिती ; कार्यकर्त्यांनी केलं जोरदार स्वागत जबलपूर (म.प्र.) ।दिनांक १०। भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे आजपासून चार दिवस मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्ष पूर्तीबद्दल एक विशेष अभियान त्यांच्या उपस्थितीत विविध विधानसभा क्षेत्रात  पार पडत आहे.    मध्यप्रदेशच्या चार दिवसाच्या दौऱ्याकरिता आज सकाळी पंकजाताई मुंडे नागपूरहून जबलपूरला रवाना झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्ष पूर्तीबद्दल त्यांच्या उपस्थितीत एक विशेष अभियान मध्यप्रदेश भाजपकडून   राबविण्यात येत आहे. जबलपूरसह शहाडोल, बालाघाट, मंडला आदी क्षेत्रात त्यांचे विविध कार्यक्रम, पत्रकार परिषदा, जनसभा, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठका आदींचे आयोजन केले गेले आहे. तत्पूर्वी आज सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. याठिकाणी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी लिहिलेलं 'मोदीजी आर्क

खा.रजनीताई पाटिल यांच्या हस्ते नुतन पदाधिका-यांना नियुक्ती पञ देऊन केला सत्कार

इमेज
 खा.रजनीताई पाटिल यांच्या हस्ते नुतन पदाधिका-यांना नियुक्ती पञ देऊन केला सत्कार परळी प्रतिनिधी  केज येथे खा.रजनीताई पाटिल,माजी खा.अशोक पाटिल युवाने आदित्य पाटिल जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख व शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात व विविध विषयावर एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली याच बैठकीत परळी शहरातील काँग्रेस पक्षाच्या नविन पदाधिका-या नियुक्त्या घोषीत करण्यात आल्या आसुन लागलीच त्यांना नियुक्ती पञ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. परळी विधानसभा युवक अध्यक्ष रणजित देशमुख यांनी जिल्हा अध्यक्ष व युवक जिल्हा अध्यक्ष यांच्या अनुमतीने पूर्वी अध्यक्ष म्हणून काम करीत असलेले धर्मराज खोसे यांना युवक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली तर  शेख अलीम शेख नूर,यांची युवक शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली व कार्याध्यक्ष मजमुन महेश वडके,उपाध्यक्ष अजय पिंपळे. ऋषिकेश लोमटे,लखन सुरवसे,सैय्यद फारुक,मारुती दराडे,रवींद्र देशमुख, उज्जेफ सिद्दीकी  यांना नियुक्ती पत्र बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष उपाध्यक्ष राहुल भय्या सोनवणे यांच्या उपस्थित आदित्य भाया पाटील यां
इमेज
  MB NEWS |माझी बातमी - E-Paper 10 June 2023 सप्रेम नमस्कार!      प्रिय वाचक, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सेवेत विविध बातम्या व माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. डिजीटल व ऑनलाईन बातम्या तत्परतेने आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे.या अनुषंगानेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म बरोबरच E-Paper डिझाईन करण्याचा एक प्रयत्न करून पाहत आहोत. हा प्रयत्न आपणास कसा वाटला हे नक्की काॅमेन्ट मध्ये कळवा. आपली साथ,सहकार्य लाभलेच आहे यापुढेही राहिल हे निश्चित.............! ●  आजचा डिजीटल पेपर. Page no.1.......  मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी MB NEWS पाहा तुमच्या मोबाईलवर.. प्रत्येक बातमी सर्वात आधी  MB NEWS वर.   विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, , क्राईम,  पाहा   MB NEWS  वर | निवडणूक,  Election, अपडेटसाठी लॉग ऑन करा. https://majhibatmi.blogspot.com Page no.2....... Subscribe YouTube channel: https://youtube.com/@manswibhawawishwa-mbnews Page no.3....... Social Media Handles:Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100063502916437&

कोणत्याही व्यवसाय प्रक्रीयेत बालकामगार ठेवू नयेत

इमेज
  बालकामगार प्रथा विरोधी दिवस 12 जुन निमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन कोणत्याही व्यवसाय प्रक्रीयेत बालकामगार ठेवू नयेत बीड, दि. 9 (जि. मा. का.) :- बाल कामगार ही एक अनिष्ठ प्रथा असुन ती नष्ट करण्यासाठी शासनाचे सतत प्रयत्न चालू आहेत. मात्र ही प्रथा कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात आहे. ज्या वयात मुलांनी शिकायचे, खेळायचे, हसायचे त्या वयात मुलांना कामावर जावे लागणे हे अयोग्य आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालक मुलांना कामावर पाठवतात व मालक त्यांना अल्पशा मजुरीवर कामावर ठेवतात. ही बाब निश्चीतच भूषनावह नाही. 12 जुन हा बालकामगार प्रथा विरोधी दिवसाचे औचित्य साधून मी जिल्ह्यातील सर्व हॉटेल चालक, चहाच्या टप-या, विविध प्रकारचे दुकाने, गॅरेज, विटभाटी, खडीकेंद्रे, जिनींग प्रेसींग, कत्तल खाने व इतर सर्व धोकादायक उद्योगातील मालकांना विनंती करते की, आपण आपल्या अस्थापनेत बालकामगार कामावर ठेऊ नयेत तसेच पालकांनाही विनंती करते की, थोड्याशा मजुरीच्या लोभापोटी आपल्या बाळाचे आयुष्य होरपळून टाकु नका. बालकामगार उच्चाटनासाठी शासनाने अत्यंत कडक कादेशीर पाऊले उचललेली आहेत.बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियम असुधा

लाभ मिळाला नसल्यास ई -केवायसी करणेचे आवाहन

इमेज
  शेतक-यांना नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी मदतीचा लाभ वितरण सुरु  लाभ मिळाला नसल्यास ई -केवायसी करणेचे आवाहन               बीड, दि. 9 (जि. मा. का.):- सप्टेबर व आक्टोंबर 2022 या कालावधीत आपत्तीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीभूत पध्दतीने थेट लाभार्थी हस्तांतरण प्रणालीमार्फंत अन्वये राज्यातील शेतक-यांसाठी केली असून मदत दिली जाणार असून यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तती योजना 2019 अंतर्गत कर्जमुक्ती योजनेचा लाभ या प्रणालीमार्फंत राज्यातील शेतक-यांच्या खात्यात दिला जात आहे. या धर्तीवर योजनेची अंमलबजावणी चालू झाली आहे. सदर प्रणालीमध्ये शेतीपिकांच्या शेतजमिनीच्या नुकसानीपोटी द्यावयाच्या मदतीबाबतची लाभर्थ्याची माहिती PORTAL LINK   https://mh.disastermanagment.mahait.org प्रणालीमध्ये भरण्यात आली आहे. तरीही अद्यापपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये निधी जमा झालेला नाही अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी खाली दिल्यानुसार कार्यवाही करावी.  1. आपले आधार आपल्या बँक खात्यासोबत लिंक करुन घ्यावे. 2. जर आधार इनअक्टीव्ह (Inactive )

जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन अनुदान

इमेज
  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24: जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन अनुदान  शेतकयांनी महाडीबीटी पोर्टल अर्ज करण्याचे आवाहन बीड, दि. 09 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी याफळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन या बाबींचा  समावेश आहे.   राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांचे अनुदान खालीलप्रमाणे आहे  तरी, सर्व शेतकयांना आवाहन करण्यात येते की, विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिक.

श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी परळी शहरात आगमन

इमेज
  श्रीसंत गजानन महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी परळी शहरात आगमन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-शेगांव संस्थान येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे मंगळवार दि.13 जून 2023 रोजी परळी शहरात आगमन होणार आहे. शेगांव येथुन पंढरपुरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी व पंचक्रोशितील भक्तभावीक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असुन येत्या 13 जून  मंगळवारी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी शहरात आगमन होत आहे. ही पालखी शहराच्या मुख्य रस्त्यावरुन जात असतांना भाविक मोठ्या श्रद्धेने या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. मंगळवार सकाळी 6.30 वाजता उड्डाणपुलावर या पालखीचे स्वागत होणार आहे. ज्या भाविकभक्तांना देणगी द्यावयाची आहे त्यांची  देणगी हासानंद बेगराज सामत कापड दुकान व अतुल क्लॉथ येथे स्विकारली जाईल. सर्व कापड व्यापारी व विविध व्यापारी यांच्याकडुन पालखीची सेवा व व्यवस्था केली जाते अशी माहिती विजय हासानंद सामत, विक्रम देशमुख, श्रीकांत गुंडाळे, रंजित भोयटे,  रामकिशन देवशटवार यांनी दिली. श्री गजानन महाराज यांची पालखी दि.13 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासुन परळीतील ज
इमेज
  वातावरण खराब करण्याचा प्रयत्न:बीड जिल्ह्यातील तरुणाकडून सोशल मीडियावर औरंगजेबाचे फोटो, गुन्हा दाखल; आष्टी शहर बंदची हाक बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका युवकाने फेसबुकवर औरंगजेबाचा फोटो पोस्ट केला. त्यामुळे गुरुवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर काही हिंदू संघटनाने पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी आष्टी शहर बंदची हाक हिंदुत्वाची संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.    कोल्हापुरात औरंगजेबाच्या फोटोमुळे झालेली दंगलीची घटना ताजी असतानाच आता बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात देखील असाच प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर औरंगजेबाचा फोटो ठेवला होता. इतकेच नाही तर त्यावर आक्षेपार्ह कमेंट देखील केली. त्यामुळे आष्टी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधी अहमदनगर मग कोल्हापूर आता बीड अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका मिरवणुकी दरम्यान औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच कोल्हापुर