संविधान समता दिंडी:एक दिवस तरी वारी अनुभवावी



जय हरी 

संतांनी सांगितलेला समतेचा विचार आणि भारतीय संविधानातील मूल्ये एकमेकांना पूरक आणि सुसंगत आहेत. त्यामुळेच आम्ही हा विचार मनात ठेवून गेली १० वर्षे ''एक दिवस तरी, वारी अनुभवावी'' या उक्तीनुसार वारी सहभागी असतो. तसेच, गेली गेली ५ वर्षांपासून आम्ही ''संविधान समता दिंडी'' च्या माध्यमातून पंढरपूरपर्यन्त दिंडी नेत आहोत.


संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सोयराबाई, संत जनाबाई आदी सर्व संत मांदियाळीने सांगितलेला समतेचा विचार आम्ही लोकांपर्यंत घेवून जात आहात. याच विचाराला जोडून आम्ही समतेचा झेंडा खांद्यावर घेवून  पंढरपूरला निघालो आहोत.


मंगळवार, दि. १३ जून २०२३ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळात पंढरपूरला जाणाऱ्या समता दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या गंजपेठेतील वाड्यावर आपण यावे, यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण !


संताचा समतेचा विचार आपणही आपल्या वारकरी भावा-बहिणीसोबत  पंढरपूरपर्यंत नेत आहात. तुमच्या दिंडीचा सत्कार देखील आम्ही करू इच्छित आहोत. आपण उपस्थित रहाल ही अपेक्षा ! 

जय हरी !


: संपर्क

शामसुंदर महाराज सोन्नर : 9594999409, सुमित : 7020860942, सरस्वती : 7218085089


 ■  आपले नम्र  ■ 

ह.भ.प. शामसुंदर सोन्नर , ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर, शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, नागेश जाधव, नितीन वाळके,  सरस्वती शिंदे,  राजाभाऊ अवसक, संदीप आखाडे, सुनील स्वामी, दत्ता पाकिरे, अनुराधा नारकर, विशाल विमल, साधना शिंदे, सुभाष वारे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार