युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 खा.शरद पवार  व खा.संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; महाविकास आघाडीचा बीडमध्ये  मूक मोर्चाचे आयोजन 


आ.धनंजय मुंडे, प्रकाश दादा सोळंके, सतिश चव्हाण, विक्रम काळे, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, माजी आ.अमरसिंह पंडित आदींची उपस्थिती


या भव्य मूक मोर्चास उपस्थित रहा - ऍड.राजेश्वर चव्हाण, बाळा बांगर


बीड दि.११ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार व शिवसेना (उबाठा) चे खा.संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी काही समाज कंटकांकडून देण्यात आली आहे. राज्यभरातून अश्या माथेफिरूविरोधात संतापाची लाट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज (दि.१२) बीडमध्ये महाविकास आघाडी आणि   समविचारी पक्ष, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार असून यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांनी केले. 

         

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून पवारांना धमकी दिली. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र शरद पवार यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचे काम भाजपच्या वतीने सुरु असून खा.संजय राऊत यांना देखील धमकीचे पत्र देण्यात आले आहे.त्यामुळे या धमकीचा जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी,समविचारी पक्ष व संघटनाकडून मुक मोर्चा आज (दि.१२ )सकाळी १० वाजता छञपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यात येणार आहे.


या मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, आ.धनंजय मुंडे, आ.प्रकाश दादा सोळंके,आ.सतिश भाऊ चव्हाण,आ.विक्रम काळे गुरुजी, माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब, आ.बाळासाहेब आजबे काका, आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.राजेंद्र जगताप, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार सलीम सय्यद, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार संजयभाऊ दौंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे, डॉ. सेलचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.नरेंद्र काळे, बजरंग सोनवणे, राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण, सुशीलाताई मोराळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शिवसेना (उबाठा) चे जिल्हाध्यक्ष अनिलदादा जगताप, जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे यांसह आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान या मोर्च्यात हजारोंच्या संख्येने संख्येने सहभागी व्हा असे आवाहन  राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या