इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

  लोखंडी गज  उघडे  पडल्याने अपघातांना निमंत्रण 




नेकनूर,

 अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीत मार्गावर नेकनुर ते मांजरसुंभा दरम्यान गवारी फाट्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून रस्ते कामासाठी वापरण्यात आलेले लोखंडी गज उघडे पडले असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असुन संबंधीत प्रकरणात जबाबदार ठेकेदार एचपीएम कंपनी व अभियंत्यावर कारवाई करण्यात येऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अशी लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी, प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे, मुख्य अभियंता म.रा.र.वि.म(मर्या) मुंबई यांना केली आहे.


जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा अवमान

---

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी दुरावस्थे संदर्भात डॉ.गणेश ढवळे यांनी दि.०२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिल्यानंतर त्या अनुषंगाने अपर जिल्हादंडाधिकारी संतोष राऊत यांनी प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद यांना नियमानुसार आवश्यक कार्यवाही करणेबाबत कळवले होते मात्र या घटनेला ५ महिने होऊनही कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवमानना प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!