VIDEOS: व्हिडीओ:संत गजानन महाराज दिंडी परळीत


VIDEOS: व्हिडीओ:संत गजानन महाराज दिंडी परळीत


श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज व चांदूरबाजार येथील श्री संत गुलाब महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी सकाळी 7 वाजता मोंढा मार्केट येथील संकटमोचन हनुमान मंदिर येथे आगमन झाले. यावेळी परळीकरांच्या वतीने पालखी दिंडीचे जल्लोषात, उत्साहात स्वागत केले.


टाळ मृदुंगाच्या तालावर दिंडीतील हजारो वारकर्‍यांनी ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’च्या गजरात ठेका धरला. ‘पंढरीनाथ महाराज की जय‘, ‘विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल’ ‘संत गजानन महाराज की जय’, ‘गण गण गणात बोते’ या जयघोषाने एकापाठोपाठ एक सुंदर अशा चालीवर भजन करीत या वारकर्‍यांनी परळी शहर अक्षरशः दणाणून सोडला.


परळी विविध व्यापारी महासंघाच्या वतीने वारकर्‍यांचे, श्रींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोंढा मार्केट येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात भाविकांकरीता अल्पोपहारासह फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकर्‍यासह अन्य भाविकांनीही या फराळाचा आस्वाद घेतला. तेथून दिंडीने राणी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे श्री संत जगमित्र नागा मंदिरकडे प्रस्थान केले. शेकडो व्यापार्‍यार्ंंनी या दिंडीचे, भाविकांचे जल्लोषात स्वागत केले. जगमित्र नागा मंदिर येथे आज 13 जुन रोजी दिंडी मुक्कामी राहणार आहे. 14 जुन रोजी सकाळी 5 वा.पालखी कन्हेरवाडी मार्गे अंबाजोगाईकडे प्रस्थान करणार 





 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !