शिक्षणाधिकारी कार्यालयावर शालेय पोषण कामगार विराट मोर्चाचे आयोजन 






परळी / प्रतिनिधी


बीड जिल्हयातील शालेय पोषण कामगारांचा विविध प्रलंबीत न्याय मागण्या मंजुर करून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.बीड यांच्या कार्यालयावर विराट मोर्च्याचे आयोजन केले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नागरगोजे, सरचिटणीस डॉ. अशोक थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकात नमुद करून कामगारांना मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले आहे.


सन २००२ पासून राज्यात शालेय पोषण आहार योजना सुरू आहे. जि.प.शाळा व खाजगी संस्थेतील शाळेत पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या मुला-मुलीसाठी या योजने मार्फत दुपारचे भोजन दिले जाते. मध्यान्ह भोजन बनवणाऱ्या स्वयंपाकी, मदतनिस यांना दरमहा १५००/- रूपये मानधन म्हणजे दररोज ५० रुपये दिले जाते.


२० वर्षापासून शाळेत काम करत असलेल्या शालेय पोषण कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहेत. म्हणुन या मोर्चाचे आयोजन अध्यक्ष प्रभाकर नागरगोजे, सरचिटणीस डॉ. अशोक थोरात यांच्या नेतृत्वात केले आहे. संघटनेच्या संघर्षातुन काही मागण्या मान्य झाल्या आहेत. आणि  बऱ्याच मागण्या प्रलंबीत आहेत. केरळ सरकारच्या धर्तीवर शालेय पोषण कामगारांना १८ हजार रूपये मानधन द्या. सेंट्रल किचन प्रणाली बंद करा, वर्षातील १२ ही महिने कामगारांना मानधन द्या, मानधन वाढ तात्काळ कामगारांच्या बँक खात्यात जमा करा, इंधन भाजीपाला पुरक आहाराचे थकीत बील वितरीत करा, उच्च व चांगल्या प्रतिचा तांदुळ, कडधान्ये व धान्यादी माल पुरवठा करा, ६५ वर्षे वय झालेल्या कामगारांना सेवापूर्ती म्हणुन १ लाख रूपये सानुगृह अनुदान या. शालेय पोषण कामगारांना पेन्शन योजना लागू करा, शासनामार्फत कामगारांना विशिष्ट गणवेश द्या.


इत्यादी सह बऱ्याच मागण्या प्रलंबीत आहेत. त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी १२ जुन २०२३ वार सोमवार रोजी शिक्षणाधिकारी जि.प.बीड यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. तरी सर्व शालेय पोषण कामगारांनी हजर राहुन मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन शालेय पोषण आहार कामगार संघटना बीड जिल्हा कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !