इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

निवृत्त शिक्षणाधिकारी राघवेंद्र उर्फ आर आर कुलकर्णी यांचे निधन



 बीड- येथील निवृत्त शिक्षणाधिकारी राघवेंद्र उर्फ आर आर कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते.                                   एक प्रामाणिक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते सुपरिचित होते.त्यांनी आपल्या शिक्षणाधिकारी पदाच्या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते.अधिकारी आणि कर्मचारी वर्गात आदराचे स्थान असलेले आर आर कुलकर्णी गेल्या काही दिवसापासून बीडच्या लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.      

  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा श्याम,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. बीड येथील विशेष लेखा परीक्षक वर्ग 2 श्याम पिंपरकर कुलकर्णी यांचे ते वडील होते.     

 त्यांच्या पार्थिव देहावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता बीडच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या