परळीकरांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज व  गुलाब महाराज यांच्या दिंडीचे उत्साहात स्वागत




परळी वैजनाथ/ संतोष जुजगर 

श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज व चांदूरबाजार येथील श्री संत गुलाब महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी सकाळी 7 वाजता मोंढा मार्केट येथील संकटमोचन हनुमान मंदिर येथे आगमन झाले. यावेळी परळीकरांच्या वतीने पालखी दिंडीचे  जल्लोषात, उत्साहात स्वागत केले.

टाळ मृदुंगाच्या तालावर दिंडीतील हजारो वारकर्‍यांनी ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’च्या गजरात ठेका धरला. ‘पंढरीनाथ महाराज की जय‘, ‘विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल’ ‘संत गजानन महाराज की जय’, ‘गण गण गणात बोते’ या जयघोषाने एकापाठोपाठ एक सुंदर अशा चालीवर  भजन करीत या वारकर्‍यांनी परळी शहर अक्षरशः दणाणून सोडला.

परळी विविध व्यापारी महासंघाच्या वतीने वारकर्‍यांचे, श्रींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत  दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोंढा मार्केट येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात भाविकांकरीता अल्पोपहारासह फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकर्‍यासह अन्य भाविकांनीही या फराळाचा आस्वाद घेतला. तेथून दिंडीने राणी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे श्री संत जगमित्र नागा मंदिरकडे प्रस्थान केले. शेकडो व्यापार्‍यार्ंंनी या दिंडीचे, भाविकांचे जल्लोषात स्वागत केले. जगमित्र नागा मंदिर येथे आज 13 जुन रोजी दिंडी मुक्कामी राहणार आहे. 14 जुन रोजी सकाळी 5 वा.पालखी कन्हेरवाडी मार्गे अंबाजोगाईकडे प्रस्थान करणार आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !