इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 नगर परिषदेची कर वसुलीची विशेष मोहीम

नागरिकांनी विविध करांचा भरणा करून संभाव्य कारवाई टाळावी - मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

       परळी नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडे थकीत असलेल्या विविध करांचा भरणा करून संभाव्य कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे. 

       परळी नगर परिषदेने सन 2023 -24 या आर्थिक वर्षाचे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्या उद्दीष्ट्यपुर्तीसाठी नगर परिषदेने शहरामध्ये विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. नागरिकांनी त्यांच्याकडे घरपट्टी, मालमत्ता कर, जमीन कर, इमारत किराया, मोबाईल टाॅवर भाडे, दुकान भाडे, नळपट्टी आदी करांचा तातडीने भरणा करावा. विविध करांचा वेळेवर भरणा केला नाही तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मुख्याधिकारी कांबळे यांनी दिला आहे.

      करांच्या वसुलीसाठी नगर परिषदेने विविध पथके तयार करण्यात आली आहेत. पथकातील कर्मचारी नागरीकांकडे जाऊन विविध करांचा भरणा करण्याचे आवाहन करीत आहेत. नागरीकांचाही या वसुली मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी बरेच नागरीक करांचा भरणा करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. ज्यांच्याकडे थकीत कर आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आपल्याकडील करांचा भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या