पंकजाताई मुंडे चार दिवसाच्या मध्यप्रदेश दौऱ्यावर

मोदी @ 9 अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांना उपस्थिती ; कार्यकर्त्यांनी केलं जोरदार स्वागत


जबलपूर (म.प्र.) ।दिनांक १०।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे आजपासून चार दिवस मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्ष पूर्तीबद्दल एक विशेष अभियान त्यांच्या उपस्थितीत विविध विधानसभा क्षेत्रात  पार पडत आहे. 


  मध्यप्रदेशच्या चार दिवसाच्या दौऱ्याकरिता आज सकाळी पंकजाताई मुंडे नागपूरहून जबलपूरला रवाना झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्ष पूर्तीबद्दल त्यांच्या उपस्थितीत एक विशेष अभियान मध्यप्रदेश भाजपकडून   राबविण्यात येत आहे. जबलपूरसह शहाडोल, बालाघाट, मंडला आदी क्षेत्रात त्यांचे विविध कार्यक्रम, पत्रकार परिषदा, जनसभा, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठका आदींचे आयोजन केले गेले आहे. तत्पूर्वी आज सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. याठिकाणी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी लिहिलेलं 'मोदीजी आर्किटेक्ट ऑफ इंडिया' हे पुस्तक मुनगंटीवार यांनी पंकजाताईंना यावेळी भेट दिलं.


    दुपारी जबलपूर येथे पोहोचताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंकजाताईंचं जोरदार स्वागत केलं. दुपारी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. वंचित, पिडित घटक, मागासवर्गीय, लहान मुलं, वृद्ध, महिला, मजूर आणि विद्यार्थी यांचा विकास लक्षात घेऊन केंद्र आणि मध्य प्रदेश सरकारने अनेक प्रभावी योजना सुरू केल्या आहेत, या कल्याणकारी योजना सरकारने यशस्वीपणे राबविल्या असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी भाजप अनुसूचित आघाडीचे सरचिटणीस व खासदार  भोला सिंग, जबलपूरचे खासदार राकेश सिंह यांच्यासह पदाधिकारी  उपस्थित होते. संध्याकाळी गैरिसन ग्राऊंडवर त्यांनी जाहीर सभेस संबोधित केलं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार