अग्निशमन वेळीच पोहोचल्याने आग आटोक्यात

 कॉटन इंडस्ट्रीजला आग; वीस लाखांचे नुकसान

अग्निशमन वेळीच पोहोचल्याने आग आटोक्यात


गेवराई...

 गेवराई शहराजवळ असलेल्या महाबली कॉटन इंडस्ट्रीजला आज दि. 12 जून सोमवार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रेसिंग मध्ये काम चालू असताना अति उष्णतेमुळे व स्पार्किंग मुळे आगीची ठिणगी पडून आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या आगीमध्ये प्रेसिंग मध्ये चालू असलेला कापूस, रुई व गठान जळून वीस लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वेळीच कृषी उत्पन्न बाजार समितीची अग्निशमन गाडी पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाबली कॉटन इंडस्ट्रीज गेल्या तेरा वर्षापासून कार्यरत असून कापूस व्यापारामध्ये महाबली कॉटन इंडस्ट्रीजचे मोठे नाव आहे. गेवराई तालुक्यातील कापूस व्यापारामध्ये महाबली इंडस्ट्रीज चा मोठा हातभार आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मदत करण्यात येते. गेल्या तेरा वर्षांमध्ये एकदाही आग लागण्याचा असा अनुचित प्रकार घडलेला नाही. परंतु दिनांक 12 जून रोजी अति उष्णतेमुळे व स्पार्किंग मुळे आगीची ठिणगी पडून आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून या आगीमध्ये प्रेसिंग मध्ये चालू असलेला कापूस, रुई व गठान जळून वीस लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वेळीच कृषी उत्पन्न बाजार समितीची अग्निशमन गाडी पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच अनेक टँकर धारक त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी मदतीसाठी धावून आले. जिनिंग मध्ये उपस्थित असलेले सर्व कामगार व शेतकरी आग विझवण्यासाठी मदत करू लागले. सर्वांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले परंतु या घटनेमध्ये वीस लाखांच्यावर नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप पर्यंत गेवराई पोलीस घटनास्थळी पोहोचले नसून अग्निशमनच्या कार्यतत्परतेमुळे आग विजवण्यात यश आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार