युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी परळी शहरात आगमन

 श्रीसंत गजानन महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी परळी शहरात आगमन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-शेगांव संस्थान येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे मंगळवार दि.13 जून 2023 रोजी परळी शहरात आगमन होणार आहे.

शेगांव येथुन पंढरपुरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी व पंचक्रोशितील भक्तभावीक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असुन येत्या 13 जून  मंगळवारी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी शहरात आगमन होत आहे. ही पालखी शहराच्या मुख्य रस्त्यावरुन जात असतांना भाविक मोठ्या श्रद्धेने या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. मंगळवार सकाळी 6.30 वाजता उड्डाणपुलावर या पालखीचे स्वागत होणार आहे. ज्या भाविकभक्तांना देणगी द्यावयाची आहे त्यांची  देणगी हासानंद बेगराज सामत कापड दुकान व अतुल क्लॉथ येथे स्विकारली जाईल. सर्व कापड व्यापारी व विविध व्यापारी यांच्याकडुन पालखीची सेवा व व्यवस्था केली जाते अशी माहिती विजय हासानंद सामत, विक्रम देशमुख, श्रीकांत गुंडाळे, रंजित भोयटे,  रामकिशन देवशटवार यांनी दिली.

श्री गजानन महाराज यांची पालखी दि.13 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासुन परळीतील जगमित्र नागा मंदिर येथे थांबणार असुन दि.14 जून 2023 रोजी अंबेजोगाई मार्गे पुढे प्रस्तान होणार असुन  दि.27 जून 2023 रोजी श्री क्षेत्र पंढरपुर येथे पालखी पोहचणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या