महाराष्ट्र ग्रामीण बँकेत साडे बारा लाखधाडसी चोरी सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हिआर गायब




लिंबागणेश महाराष्ट्र ग्रामीण बँकेत धाडसी चोरी ; सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत घटनास्थळी दाखल 

नेकनूर,        दि.११ जुन रविवार रोजी मध्यरात्री बीड तालुक्यातील  लिंबागणेश येथील अहमदपूर-अहमदनगर  राष्ट्रीय महामार्गावरील  लिंबागणेश  महाराष्ट्र ग्रामीण बँकेत धाडसी चोरी .सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत तसेच नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि शेख मुस्तफा, उपनिरीक्षक विलास जाधव, उपनिरीक्षक अजय पानपाटील,चालक शेख लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.ह.सचिन डिडुळ,नवनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले असुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,ठसेतज्ञ, श्वानपथक टीम दाखल झाली असुन स्थळपंचनामा करण्यात आला असून तपास चालू आहे.


      मध्यरात्री लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाठीमागील बाजुने लोखंडी शिडीवरून चढून गस कटरच्या सहाय्याने लोखंडी खिडकीचे गज तोंडुन आत प्रवेश केला व स्ट्रागरूम कटरने फोडुन बँक मनेजर प्रणव कापसे यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे साडे बारा लाख रोख रक्कम व काही सोने चोरीला गेले आहे.


 सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हिआर गायब

----

बँकेत सीसीटीव्हीची सोय होती मात्र रात्रपाळीसाठी सुरक्षारक्षक नव्हता.चोरठ्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला आहे, बँकेच्या आसपास असणाऱ्या दुकानावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणे व ईतर आवश्यक तपास सुरू असुन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत ठाण मांडून बसले आहेत.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !