वातावरण खराब करण्याचा प्रयत्न:बीड जिल्ह्यातील तरुणाकडून सोशल मीडियावर औरंगजेबाचे फोटो, गुन्हा दाखल; आष्टी शहर बंदची हाक






बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका युवकाने फेसबुकवर औरंगजेबाचा फोटो पोस्ट केला. त्यामुळे गुरुवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर काही हिंदू संघटनाने पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी आष्टी शहर बंदची हाक हिंदुत्वाची संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
   कोल्हापुरात औरंगजेबाच्या फोटोमुळे झालेली दंगलीची घटना ताजी असतानाच आता बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात देखील असाच प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर औरंगजेबाचा फोटो ठेवला होता. इतकेच नाही तर त्यावर आक्षेपार्ह कमेंट देखील केली. त्यामुळे आष्टी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आधी अहमदनगर मग कोल्हापूर आता बीड

अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका मिरवणुकी दरम्यान औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच कोल्हापुरामध्ये व्हाट्सअप स्टेटस वर काही लोकांनी औरंगजेबाचे फोटो ठेवले होते. त्यानंतर कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील आष्टी मध्ये देखील असाच प्रकार समोर आला असून यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार