लाभ मिळाला नसल्यास ई -केवायसी करणेचे आवाहन

 शेतक-यांना नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी मदतीचा लाभ वितरण सुरु 


लाभ मिळाला नसल्यास ई -केवायसी करणेचे आवाहन  


 


          बीड, दि. 9 (जि. मा. का.):- सप्टेबर व आक्टोंबर 2022 या कालावधीत आपत्तीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीभूत पध्दतीने थेट लाभार्थी हस्तांतरण प्रणालीमार्फंत अन्वये राज्यातील शेतक-यांसाठी केली असून मदत दिली जाणार असून यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे.


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तती योजना 2019 अंतर्गत कर्जमुक्ती योजनेचा लाभ या प्रणालीमार्फंत राज्यातील शेतक-यांच्या खात्यात दिला जात आहे. या धर्तीवर योजनेची अंमलबजावणी चालू झाली आहे.


सदर प्रणालीमध्ये शेतीपिकांच्या शेतजमिनीच्या नुकसानीपोटी द्यावयाच्या मदतीबाबतची लाभर्थ्याची माहिती PORTAL LINK   https://mh.disastermanagment.mahait.org प्रणालीमध्ये भरण्यात आली आहे. तरीही अद्यापपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये निधी जमा झालेला नाही अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी खाली दिल्यानुसार कार्यवाही करावी.


 1. आपले आधार आपल्या बँक खात्यासोबत लिंक करुन घ्यावे.


2. जर आधार इनअक्टीव्ह (Inactive ) असेल तर आधार केंद्रात जावून ॲक्टीव्ह करुन घ्यावे.


3. बँक खाते आधारला लिंक आहे का ते बँकेमध्ये जावून चेक करुन घ्यावे. बँक अकौन्ट ॲक्टीव्ह करुन घ्यावे.


 


4. वरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराने  आधार प्रमाणीकरणसाठी आपले VK LIST वरुन नंबर नोंद करुन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई -केवायसी EKYC करावयाचे आहे. ई -केवायसी EKYC झाल्याशिवाय लाभार्थ्यांची लाभाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही.


ई -केवायसी (EKYC) साठी पुढील कागदपत्रे घेवून जावे.


1.       आधारकार्ड


2.       बचत खात्याचे पासबुक


3. यादीतील आपल्या नावासमोरील नमूद विशिष्ट क्रमांक  (स्वत: लिहून न्यावा)


4.काही विसंगती असल्यास त्याबाबत शेतकरी तशी तक्रार संबंधित पोर्टलवर असहमतीचे बटन दाबून नोंदवू शकतात.


5. आधार प्रमाणीकरण सेवा निशुल्क आहे.


6.विशिष्ट क्रमांकासह यादी वाचन करण्यासाठी व शेतक-यांचे आधार प्रमाणिकरणासाठी संबंधित


ग्रामसेवक व तलाठी मार्गदर्शन करतील असे तहसिलदार बीड यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार